सापाला पाहून अनेकांची ‘पुंगी’ वाजते पण त्यानं साप ‘डायरेक्ट’ लुंगीत सोडला; नंतर काय झालं हे तुम्ही पाहा (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – तामिळनाडूमधील एका व्यक्तीने साप पकडून थेट लुंगीत सोडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याचा हा पराक्रम पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. तर अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. तर काहीना हसू आवरत नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, त्याच्याकडे लुंगीचे बरेच उपयोग आहेत. व्हिडिओत एका महाशयांनी लुंगी घातलेली दिसत आहे. त्याने पकडलेल्या लांब सापाची शेपटी धरली आहे. प्रथम ते साप पकडण्याचा प्रयत्न करतो, त्यानंतर तो अचानक लुंगी वर करून साप लुंगीच्या आत सोडतो. यावर लोकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. तो साप उंदीर खाणारा असावा, पण साप विषारी असता तर? असे म्हटले आहे.