जरा हटके ! ‘या’ बॉलिवूड अ‍ॅक्टरच्या प्रेमात एकाने खरेदी केले तब्बल ६०० ‘शर्ट्स’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड कलाकारांसाठीचे चाहत्यांमधील प्रेम हे जगजाहीर आहे. चाहते आपल्या आवडत्या कलाकारासाठी आपले प्रेम दाखवण्यासाठी काय काय करत असतात. नुकतीच एक माहिती समोर आली आहे की, एका व्यक्तीने आपल्या आवडत्या कलाकाराच्या प्रेमात ६०० शर्ट्स खरेदी केले आहेत. ज्या कलाकाराच्या प्रेमात त्याने हे केलं आहे तो कलाकार दुसरा तिसरा कोणी असून कार्तिक आर्यन आहे. बॉलिवूड रिपोर्ट्सनुसार, काही दिवसांपू्र्वी कार्तिक आर्यन मुंबईतील एका मॉलमध्ये आपल्या क्लोदिंग ब्रँडच्या लेटेस्ट कलेक्शनच्या लाँचिंगसाठी आला होता. त्यावेळी तो एका चाहत्याला भेटला. त्या चाहत्याने कार्तिक आर्यनवरील प्रेमापोटी या ब्रँडचे ६०० शर्ट्स खरेदी केले होते.

बॉलिवूडमध्ये कार्तिक आर्यन चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जातो. कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर सध्या तो लव आजकल 2 सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहे. या सिनेमात कार्तिक सोबत सारा अली खान ही देखील दिसणार आहे. याशिवाय पती पत्नी और वो या सिनेमातही तो लवकरच दिसणार आहे.

अनेकदा कार्तिक सारा अली खानमुळे चर्चेत आला आहे. सारासोबत त्याचे अनेक फोटो व्हायरल होताना दिसला आहे. साराच्या आणि त्याच्या नात्याबद्दल अनेकदा चर्चा होताना दिसते.