बसमध्ये एक्स-गर्लफ्रेंडवर चाकूने केले 30 वेळा सपासप वार, तरीही वाचले महिलेचे प्राण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मेक्सिकोमधील सिनोलोआ शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दिवसाढवळ्या गर्दी असलेल्या बसमध्ये एका व्यक्तीने आपल्या एक्स- गर्लफ्रेंडवर ३० पेक्षा जास्त वेळा चाकूने वार केले. या हल्ल्यादरम्यान महिला सतत ओरडत होती, परंतु बसमधील उपस्थित लोक हल्ला पाहून घाबरून पळून जातात, परंतु तिच्या मदतीसाठी कोणीही आले नाही. दरम्यान, या भीषण हल्ल्यानंतरही महिला जिवंत वाचली. या घटनेनंतर लोक हैराण आहेत.

माहितीनुसार, ३३ वर्षीय या पीडित महिलेचा एक्स बॉयफ्रेंड तिला भेटण्यासाठी आला आणि अचानक त्याने तिच्यावर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. या दरम्यान महिला ओरडू लागली. या माथेफिरू प्रियकराने या महिलेवर ३० पेक्षा जास्त वेळा वार केले. दरम्यान, महिला जिवंत राहण्यात यशस्वी झाली. खरं तर हिवाळ्यामुळे या महिलेने जाड विंटर जॅकेट घेतले होते. ज्यामुळे या महिलेच्या कोणत्याही महत्वाच्या भागास कोणतेही नुकसान होऊ शकले नाही आणि या महिलेचे प्राण वाचले. यानंतर जेव्हा तिचा प्रियकर हल्ला करून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता, तेव्हा बसमधील प्रवाश्यांनी या महिलेची मदत करण्यास सुरवात केली. अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. स्थानिक माध्यमांनुसार, जेव्हा या व्यक्तीला अटक केली गेली तेव्हा त्याने स्वत: ला ठार मारण्याचा देखील प्रयत्न केला. तसेच, व्हॅलेंटाईन डेच्या काही दिवसानंतर ही घटना घडल्याचे समजते, मात्र, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज नुकताच प्रसिद्ध करण्यात आले.

दरम्यान, या हल्ल्यात पीडित महिलेचे हात आणि पाय गंभीरपणे कापले गेले. मेक्सिको अटर्नी जनरल अलेजान्ड्रो मनेरो यांच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक वर्षांत मेक्सिकोमध्ये महिलांवरील हिंसाचारात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये 137 टक्के वाढ झाली आहे.