विश्रांतवाडी खाणीत एकाने उडी मारली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – विश्रांतवाडी येथील भीमनगर परिसराता असलेल्या खाणीत एका व्यक्तीने उडी मारल्याची घटना बुधवारी दुपारी समोर आली. दरम्यान अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांसह जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

विश्रांतवाडी येथील भीमनगर परिसरात एक खाण आहे. त्या खाणीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. त्या पाण्यात दुपारी एका व्यक्तीने उडी मारली. नागरिकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तेथे त्याला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी दाखल झाल्या आहेत. दरम्यान त्याने पाण्यता उडी का मारली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.