मित्राच्या पत्नीसोबतच ‘झेंगाट’, तिच्याशी लग्‍न करण्यासाठी केली मित्राची ‘गेम’

दिल्ली : वृत्तसंस्था – मित्राच्या पत्नीसोबत प्रेम जडलं आणि तिच्यासोबत लग्न करण्यासाठी मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्ली येथे घडली आहे. मित्राचा खून करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. मित्राच्या पत्नीसोबत लग्न करण्यासाठी मित्राच्या डोक्यात विटेने वार करून बेशूद्ध केले. त्यानंतर त्याला रेल्वे ट्रॅकवर सोडून दिले. गुलकेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर दलबीर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गुलकेशचे मयत दलबीरच्या पत्नीसोबत प्रेमप्रकरण होते. त्याला तिच्यासोबत लग्न करायचे होते. मात्र, दलबीरचा अडथळा येत होता. त्यामुळे त्याने त्याचा काटा काढण्याचे ठरवले. आरोपीने रात्री दलबीरला फोन करून बोलावून घेतले. झकीरा रेल्वे ट्रॅकजवळ दलबीरला घेऊन गेला. त्याठीकाणी त्याच्या डोक्यात विटेने वार करून त्याला बेशुद्ध केले आणि त्याच अवस्थेत त्याला रेल्वे ट्रॅकवर टाकून दिले. जेणेकरून मृतदेहाचे तुकडे व्हावेत आणि पोलिसांना आपला पत्ता लागणार नाही.

खून केल्यानंतर त्याने पोलिसांनी फोन केला. फोन करून त्याने रेल्वे ट्रॅकजवळ आपल्या एका ओळखीच्या व्यक्तीचा मृतदेह पडला असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपास सुरु केला. मात्र तपासादरम्यान त्याने पोलिसांना गंडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी गुलकेशच्या मोबाईलचे रेकॉर्ड तपासून पाहिले. घटनेच्यावेळी आरोपीच्या मोबाईलचे लोकेशन रेल्वे ट्रॅकजवळ दाखवत होते.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दलबीरच्या पत्नीसोबत आपले प्रमसंबंध होते. त्याला तिच्यासोबत लग्न करायचे होते. मात्र, दलबीरमुळे ती लग्नास तयार होत नव्हती. यामुळेच त्याने मित्राचा काटा काढल्याचे पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितले. पोलिसांनी त्याला अटक केली असून या गुन्ह्यात दलबीरच्या पत्नीचा सहभाग आहे का या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त –
फेसबुक पोस्टवरून समजणार तुम्ही कोणत्या आजाराशी झगडताय !
वजन घटवायचंय… मग शांत झोप घ्या !
‘नाईट क्रीम’ ठेवते त्वचेला तजेलदार आणि तरुण
या ‘मार्गांचा’ अवलंब करा आयुष्यात व्हाल यशस्वी