घृणास्पद ! मुंबईतील महिला लेखिकेला Skype कॉल करून ‘तो’ करू लागला ‘हस्तमैथुन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये स्क्रिप्ट रायटरला व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. मुंबईतील खार पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर आता पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. आपल्या तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, व्हिडीओ कॉलमध्ये कॉलरचा चेहरा दिसत नव्हता. तिला काही कळायच्या आतच तो इसम हस्तमैथुन करू लागला.

पीडित महिला एका वेब टेलिव्हिजन शोची स्क्रिप्ट रायटर आहे. महिलेने सांगितले की, “तिच्या स्काईप नंबरवर एक अनोळखी कॉल आला. त्यानंतर आरोपी एकदम अश्लील चाळे करू लागला. हे पाहून ती हैराण झाली. यानंतर सदर महिलेने मुंबई पोलिसांना ट्विट करत ऑनलाईन केस दाखल केली. यानंतर महिलेला खार पोलीस ठाण्यात येऊन एफआयआर दाखल करण्यास सांगितले.

एफआयआर दाखल , पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

शनिवारी सकाळी पीडित महिला खार पोलीस ठाण्यात आली आणि एफआयआर दाखल केली. आपल्या तक्रारीत पीडित महिला म्हणाली की, “मी माझ्या घरी होते. दुपारी ४ वाजून २१ मिनिटांनी एक स्काईप कॉल आला. मला त्या व्यक्तिचा चेहरा दिसत नव्हता. परंतु तो हस्तमैथुन करत होता. मी स्क्रिनशॉट घेऊन तक्रार दाखल केली आणि कॉल कट केला.”

सायबर पोलिसांच्या मदतीने आरोपीचा नंबर ट्रेस

शनिवारी पीडित महिलेने ट्विट केले की, तिने पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल केली आहे. तिने सर्वांना खास करून मुंबई पोलिसांना धन्यवाद दिले. खार पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “या प्रकारचा पहिलाच प्रकार समोर आला आहे ज्यात एक व्यक्ती ऑनलाईन व्हिडीओ कॉलवर हस्तमैथुन करत होता. जास्त करून असे प्रकार रस्त्यावरील असतात ज्यांच्या तक्रारी समोर येतात. आम्ही सायबर पोलिसांच्या मदतीने आरोपीचा नंबर ट्रेस करत आहोत.”

मुंबई पोलीस प्रवक्ता डीसीपी मंजूनाथ सिंगे म्हणाले की, “खार पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आयपीसी मधील कलम ५०९ आणि आयटी अॅक्ट कलम ६७ नुसार केस दाखल करण्यात आली आहे.

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा