‘लॉकडाऊन’मध्ये 18 वर्षानंतर गावी परतले, आई आणि पत्नी दोघींचाही झाला होता ‘मृत्यू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 18 वर्षांपूर्वी नाराज होऊन घरातून बाहेर पडलेल्या महंगी प्रसादवर जेव्हा कोरोना काळात लॉकडाऊनचा परिणाम झाला तेव्हा ते मुंबईहून घरी परतले. जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या नशिबी फक्त दुःखच आले. कारण ते घरी आले तेव्हा त्यांना समजले की त्यांची आई व पत्नी दोघांचा मृत्यू झाला होता. मंहगी प्रसाद यांना घरी फक्त त्यांची मुलगीच मिळाली जिला ते लहान वयातच सोडून घरातून निघून गेले होते.

उल्लेखनीय म्हणजे तरकुलवा भागातील कैथवलिया गावात राहणारे महंगी प्रसाद 18 वर्षांआधी एका गोष्टीवर पत्नीसोबत नाराज होऊन मुंबईला गेले होते. त्यावेळी ते अंदाजे 40 वर्षांचे होते. महंगी प्रसादने आई, पत्नी आणि 3 तरुण मुलींना घरी सोडून मुंबई गाठली आणि रोजीरोटीसाठी अनेक छोटी-मोठी कामे केली. एका छोट्या कारखान्यात ते पहारेकरी म्हणून काम करीत होते. यावेळी त्यांनी घर आणि गावाकडे कधीच वळून पाहिले नाही. घरातील लोकांनी महंगी यांचा बराच शोध घेतला आणि शेवटी त्यांना मृत समजून त्यांची परत येण्याची आशा सोडली.

कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाल्याने त्यांचा काम धंदा ठप्प झाला, तेव्हा काही दिवस उपाशी राहिल्यानंतर महंगी प्रसादला घराची आठवण झाली. तेथून त्यांनी ट्रकला 3500 रुपये भाड्याने दिले आणि गोरखपूरला आले आणि मग पायी चालत घरी पोहोचले. वडिलांना मृत समजून विसरलेली मुलगी आणि जावई यांनी जेव्हा महंगी प्रसाद यांना बघितले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. आता महंगी प्रसाद गावातच आपल्या मुलींबरोबर उर्वरित आयुष्य घालवतील. यावेळी त्यांची मधली मुलगी मीरा आणि जावई दशरथ सोबत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like