प्रयागराजमध्ये तरुणाचा गोळ्या घालून खून, तबलिगी ‘जमात’वर टीका केल्याचा आरोप

प्रयागराज : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. त्यापैकी 30 टक्के लोक हे तबलीगी जमातीचे आहेत. या घटनेपासून तबलीगी जमातमधील लोकांचा सोशल मीडियातून निषेध होत आहे. सोशल मीडियानंतर आता समाजातील लोकांकडून तबलीगीचा निषेध होताना पहायला मिळत आहे. याच मुद्यावरून झालेल्या वादातून प्रयागराजमध्ये एका तरुणाचा गोळ्या घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत तरुण जमातीवर टीका करत होता. याच कारणावरून आरोपीने संतापाच्या भरात तरुणाचा गोळ्या घालून खून केला.

ही घटना प्रयागराज येथील एका चहाच्या टपरीवर घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच सरकारने मृत तरुणाच्या नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. प्रयागराजच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, लोकांनी शांतता राखावी आणि या घटनेला धार्मिक वळण देऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे. हा प्रकार सकाळी साडेनऊच्या सुमार घडला.

घटना घडली त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि आरोपीने गोळी घालून तरुणाचा खून केला. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांना घटनेबाबत फोन करून माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतली. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्या आला आहे.