औरंगाबादमध्ये 33 वर्षीय व्यक्तीने चक्क गिळला ‘ब्रश’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – ३३ वर्षीय व्यक्तीने चक्क टूथब्रश गिळल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये उघडकीस आला आहे. पोटदुखीचा त्रास झाला म्हणून संबंधित व्यक्ती रुग्णालयात दाखल झाली होती. सिटीस्कॅन केल्यानंतर रुग्णाच्या पोटात चक्क टूथब्रश असल्याचं पाहून डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. रुग्णाने ब्रश नेमका का गिळला आणि कसा? हा प्रश्न डॉक्टरांना पडला होता. शेवटी डॉक्टरांनी रुग्णावर सर्जरी करण्याचा निर्णय घेतला.जवळपास दीड तास ही सर्जरी सुरु होती. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

टूथब्रश गिळल्यानंतर रुग्णाच्या पोटात दुखू लागल्याने येथील शासकीय घाटी रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी सिटीस्कॅन केलं असता त्याच्या पोटात लांबलचक टूथब्रश असल्याचं पहायला मिळाला. पोटात टूथब्रश पाहून डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. हा ब्रश जवळपास अर्धा फूट लांबीचा होता. यानंतर डॉक्टरांनी रुग्णावर सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. रुग्णावर यशस्वीपणे सर्जरी करुन ब्रश बाहेर काढण्यात आला.

या शस्त्रक्रियेसाठी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. सरोजिनी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शल्यचिकित्सा पथक क्रमांक-६ चे प्रमुख जुनेद एम. शेख, डॉ. अविनाश घाटगे, डॉ. ओमर खान, डॉ. संदीप चव्हाण, डॉ.सुकन्या विंचूरकर, डॉ.गौरवभावसार, भुलतज्ज्ञ डॉ. अनिकेत राखूडे,डॉ. विशाखा वाळके, अधिपरिचारिका संतोशी सोनगट्टी यांनी ही शस्त्रक्रिया पार पाडली.