रिक्षा चालकाने नातीला शिकविण्यासाठी विकले घर, मिळाले 24 लाखांचे बक्षीस

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन –   जगात अद्यापही माणुसकी शिल्लक असल्याचे एक उदाहरण नुकताच समोर आले आहे. वास्तविक, काही दिवसांपूर्वी मुंबईत राहणारे ७४ वर्षीय रिक्षा चालक देशराज यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर खूप लोकप्रिय असलेल्या ‘ह्यूम्स ऑफ बॉम्बे’ नावाच्या पेजने त्यांची कथा समोर आणली. ज्यात देशराज यांनी सांगितले कि, त्यांनी आपल्या नातीच्या शिक्षणासाठी आपले राहते घर विकून टाकले आणि गेल्या दोन दशकापेक्षाही जास्त काळापासून ते रिक्षातच घर बनवून राहत आहेत. देशराज यांची ही हृदयद्रावक कथा ऐकल्यानंतर अनेक मदतीचे हात समोर आले आणि त्यांच्यासाठी फंड्स गोळा करायला सुरुवात झाली. यातून आतापर्यंत २४ लाख रुपये देशराज यांना डोनेट करण्यात आले आहेत.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भावुक झालेल्या युजर्सनी देशराज यांच्यासाठी २० लाख रुपयांचा फंड गोळा करण्याचे टार्गेट ठेवले होते. दरम्यान, हे टार्गेट क्रोस झाले आणि देशराज यांना २४ लाख रुपये देण्यात आले, जेणेकरून ते स्वतःच घर बांधू शकतील. ह्यूमन्स ऑफ बॉम्बे पेजने पुन्हा एकदा देशराज यांचा व्हिडिओ शेअर केला ज्यात त्यांना २४ लाख रुपयांच्या चेकसह पाहिले गेले. या पेजच्या कॅप्शनमध्ये लिहिले गेले होते कि, देशराज यांना आपणा सर्वांचे खूप सहकार्य लाभले आहेत. तुमच्या प्रयत्नांमुळे आज त्यांच्याकडे एक पक्के छप्पर आहे आणि या घरात राहून ते आपल्या नातीला शिकवून शिक्षकही करू शकतील. आपणा सर्वांचे मनापासून आभार. सोशल मीडियावरील लोकांनीही या पोस्टचे कौतुक केले आणि देशराज यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, देशराजच्या दोन्ही मुलांचा काही वर्षांच्या अंतराने मृत्यू झाला, ज्यानंतर ७ लोकांच्या कुटुंबात त्यांच्यावरच संपूर्ण जबाबदारी आली . पत्नी आजारी पडल्यानंतर देशाराज यांची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली होती. देशराज दिवसभर रिक्षा चालवत आणि त्यातच झोपत असे. दरम्यान, या सर्व अडचणी असूनही, ते आपल्या नातीला शिकवण्यास तयार होते आणि त्यांच्या या दृढनिश्चयामुळे बरेच लोक सोशल मीडियावर त्यांचे कौतुक करीत आहेत.