सरकारने सर्वसामान्यांना फसवले : मार्क्सवादी पक्षाचा तहसीलवर मोर्चा 

कोल्हापुर : पोलीसनामा आॅनलाइन – सब का साथ, सब का विकासचा नारा देत सत्तेवर आलेल्या सरकारने कर्जबुडव्या नीरव मोदी, ललित मोदी, विजय मल्ल्या यांचाच फक्त विकास केला. नोटाबंदी, जीएसटीसारख्या निर्णयामुळे जनतेचे कंबरडे मोडले आहे. भाजप सरकारच्या चार वर्षांच्या काळात अनेक मोठे निर्णय हे सर्वसामान्य जनतेच्या विरोधात घेतले गेल्याचा आरोप करत मार्क्सवादी पक्षाने कॉ. सुभाष निकम यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले.

मोर्चाला मार्गदर्शन करताना कॉ. सुभाष निकम म्हणाले, सरकारने स्वप्ने दाखवून सर्वसामान्यांच्या चालू असलेल्या योजना बंद करून त्याऐवजी डायरेक्ट डीबीटी योजनेच्या नावाखाली जनतेला कंगाल करण्यास निघाले आहे. धान्यऐवजी रोख पैसे बँक खात्यावर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेला जनतेतून तीव्र विरोध आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलच्या किमती कमी असताना, देशात गॅस व पेट्रोलच्या किमती गगनाला भिडत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.
रेशन धान्यासाठी रोख सबसिडीचा निर्णय मागे घ्या, चालू हंगामासाठी १० ऐवजी साडेनऊ रिकव्हरी धरून ३०००, तर दर किमान ३५०० रुपये द्या, देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करा, ड वर्ग अर्जदारांना ताबडतोब प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ द्या, निराधार योजनेच्या लाभाथ्र्यांना महिना ५००० रुपये पेन्शन द्या, तालुक्यातील गावे टंचाईग्रस्त जाहीर करून नुकसानभरपाई देण्याच्या मागणीचे निवेदन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने हातकणंगले तहसीलदारांना देण्यात आले.

मुस्लिमांच्या आरक्षणासाठी शिवसेना आग्रही, भाजपला अडचणीत आणण्याची चाल