ब्यूटी क्वीनवर खतरनाक क्रिमिनल गँगचा भाग असल्याचा आरोप, होऊ शकते 50 वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   मेक्सिको येथील एका ब्यूटी क्वीनला पोलिसांनी अटक केली आहे. 25 वर्षीय या महिलेवर धोकादायक क्रिमिनल गँगचा भाग असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मेक्सिको पोलिसांनी आठ जणांना अटक केली, त्यामध्ये लॉरा मोझिका रोमेरोच्या नावाचा समावेश आहे. माहितीनुसार, जर तिच्यावर हा आरोप सिद्ध झाला तर तिला 50 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

वृत्तानुसार, 25 वर्षीय रोमेरो एका अशा क्रिमिनल गँगचा भाग आहे, जी ओएक्सका आणि वेराक्रूझसारख्या शहरांमध्ये अपहरण करण्यासाठी जबाबदार आहे. या लोकांना 11 फेब्रुवारीला शहरातील एका घरातून अटक करण्यात आल्याची पुष्टी वेराक्रूझच्या स्टेट अ‍ॅटॉर्नीने केली. या प्रकरणातील आठही आरोपींना दोन महिन्यांसाठी ताब्यात ठेवण्यात येणार आहे, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बिझिनेस ग्रॅज्युएट रोमेरो इंग्रजी भाषेत पारंगत आहे आणि स्तनाचा कर्करोग आणि ल्युकेमियासारख्या आजारांविरूद्ध जागरूकता पसरविण्यासाठी प्रसिध्द आहे. रोमेरोने 2015 मध्ये मिस अर्थ ओएक्सा जिंकला. गेल्या वर्षी ती इंटरनॅशनल क्वीन ऑफ कॉफी मध्ये रनरअप होती. या व्यतिरिक्त, तिने 2019 मध्ये मिस मेक्सिको स्पर्धेतही भाग घेतला होता आणि या स्पर्धेत ती तृतीय उपविजेती ठरली. आपल्या वक्तव्यांमुळे रोमेरो बर्‍याचदा चर्चेत राहते आणि महिलांच्या समर्थनार्थ तिने अनेक विधाने दिली आहेत. तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ती फक्त एक सुंदर चेहरा नाही आणि चांगली दिसण्याव्यतिरिक्त तिच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक आयाम आहेत. जानेवारी 2019 मध्ये रोमेरो म्हणााली की, आता वेळ आली आहे की महिलांवरील हिंसाचार संपला पाहिजे. आपण शांततेत बसू शकत नाही. आम्हाला अनेक मोहिमांच्या आणि शिक्षणाच्या मदतीने महिलांवरील हिंसाचार संपवावा लागेल. महिलांवरील हिंसाचार हा एक संवेदनशील मुद्दा आहे हे पुरुषांनीही जाणले पाहिजे.