Alaska Plane Collision : अलास्कामध्ये हवेत धडकले विमान, 7 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अमेरिकेच्या अलास्का राज्यात हवेत दोन विमानांची टक्कर झाल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार अमेरिकेच्या अलास्का राज्यातील केनाई प्रायद्वीपातील सोल्डोन्टा विमानतळाजवळ शुक्रवारी सकाळी दोन्ही विमाने हवेत धडकली. फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) च्या निवेदनानुसार, सकाळी 8:30 वाजेच्या दरम्यान विमानतळापासून ईशान्य दिशेला दोन मैलांच्या अंतरावर एक इंजिन डी हॅव्हिलँड डीएचसी -2 बीव्हर विमान दुसर्‍या दोन इंजिन असलेल्या पाइपर-पी 12 विमानास धडकून खाली कोसळले. ठार झालेल्यांमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे असेंबली मेंबर गॅरी नोप यांचा समावेश आहे.

एफएए आणि नॅशनल ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्ड (एनटीएसबी) चे अधिकारी या अपघाताची चौकशी करत आहेत. एनटीएसबी अलास्काचे प्रमुख क्लिंट जॉन्सनच्या म्हणण्यानुसार, दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानाचा मलबा स्टर्लिंग महामार्गाजवळ पडला आहे. दोन्ही विमानांनी सोल्डोन्टा विमानतळावरून उड्डाण केले आणि अँकरेज शहरापासून सुमारे 150 मैलांवर हवेत धडकले.

या दोन्ही विमानात बसलेल्या लोकांची संख्या अद्याप समजू शकलेली नाही. अपघातात अलास्का हाऊसचे प्रतिनिधी गॅरी नोप यांच्या मृत्यूची पुष्टी त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. नोपच्या पत्नी हेलन यांनी सांगितले की शुक्रवारी सकाळी ते विमान आपले उडवत होते. अलास्काचे गव्हर्नर माईक डनली यांनी शुक्रवारी आदेश दिले की सोमवारपर्यंत नोप यांच्या सन्मानार्थ अमेरिकेचा ध्वज आणि अलास्का प्रांताचा ध्वज अर्धा झुकवण्यात यावा. अलास्काच्या अनेक नेत्यांनी नोप यांच्या निधनाबद्दल शोक व संताप व्यक्त केला आहे.