पाहुणा म्हणून आलेल्याने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – घर बांधण्यासाठी गवंडी घेऊन आलेल्या व्याही याने घरातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राधानगरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

जमीर खुदबुद्दीन दरवेशी ऊर्फ पठाण (वय ४३, रा. कोगील बुद्रुक, ता़ करवीर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी १७ वर्षाच्या युवतीने राधानगरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीर हा पिडित मुलीच्या वडिलांचा व्याही आहे. त्याची मुलगी पिडित मुलीच्या भावाला दिली आहे. मुलगीचे घर बांधण्यासाठी जमीर गवंड्यांना घेऊन आला होता. त्यावेळी पिडित मुलीचे वडिल मासेमारीसाठी बाहेर गेले होते. रात्र झाल्याने जमीर याला त्यांनी घरी थांबण्यास सांगितले. मुलीचे वडिल रात्री उशिरा आले होते. घरातील सर्व मंडळी झोपलेली होती. मध्यरात्रीच्या सुमारास जमीर याने पिडित मुलगी एकटीच स्वत:च्या खोलीमध्ये असल्याची खात्री करुन तिच्या खोलीत शिरला. तिचे तोंड दाबून ‘‘चूप बैट अगर चिलाई या घरवालोंको बताया तो जान से मार दुंगा’’ अशी धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. पहाटे घरातील लोक उठण्यापूर्वी तो पळून गेला.

सकाळी या मुलीने हा सर्व प्रकार आपल्या आईच्या कानावर घातला. त्यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक उदय डुबल व पोलीस उपनिरीक्षक एम. एच. शेख व त्यांच्या सहकार्‍यांनी तात्काळ कोगील बुद्रुक येथे जाऊन जमीर पठाण याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.