ही आहे 19 वर्षांची जगातील सर्वात सुंदर तरूणी, 36 वर्षांच्या अरबपतीला करतेय डेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  19 वर्षांची मॉडल येल शेल्बिया हिने टीसी कँडलरच्या वार्षिक 100 सर्वात सुंदर चेहर्‍यांच्या यादीत पहिले स्थान मिळवले आहे. इंस्टाग्रामवर 1 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्ससह येल आपल्या ड्रीम लाइफस्टाइलमुळे सुद्धा चर्चेत असते. मात्र, या शानदार लाइफस्टाइलमुळे खुप ऑनलाइन द्वेषाचा सामना सुद्धा तिला करावा लागतो.

येलचा जन्म इस्त्रायलच्या एका छोट्या शहरात यहुदी कुटुंबात झाला होता. तिने 16 वर्षाच्या वयातच मॉडलिंग सुरू केले होते. एक स्थानिक फोटोग्राफरने इंस्टाग्राम तिची छायाचित्रे पाहिली आणि नंतर तिला एका फोटो शूटमध्ये भाग घेण्यास सांगितले, ज्यानंतर येलचे मॉडलिंग करियर धावू लागले. येलने इस्त्रायलच्या एयरफोर्समध्ये मिलिट्री सर्व्हिस सुद्धा केली आहे.

येल सध्या 36 वर्षांचा अरबपती ब्रँडन कोर्फला डेट करत आहे. ब्रँडन अमेरिकेचे अरबपती बिझनेसमॅन सम्नर रेडस्टोन यांचा नातू आहे. येलने किम कार्दशियन आणि कायली जेनर सारख्या सेलेब्सच्या स्किन रेंज प्रॉडक्ट्ससाठी मॉडलिंग सुद्धा केली आहे. तिने सुपरस्टार फुटबॉलर लियोनल मेसीसोबत सुद्धा काम केले आहे. कोरोना व्हायरसमुळे येलला सुद्धा खुप समस्यांना तोंड द्यावे लागले. मात्र ती कामासाठी पुन्हा एकदा अमेरिका आणि युरोपचा दौरा करण्यास इच्छूक आहे.

सन वेबसाइटसोबत बोलताना येल म्हणाली, मला माझ्या लुक्ससाठी खुप ट्रोल सुद्धा व्हावे लागते. मला लोकांचा खुप सपोर्ट आणि प्रेमसुद्धा मिळते. परंतु याशिवाय मला अनेक असे मॅसेज येतात ज्यामध्ये खुप द्वेष असतो. मात्र, अशा मॅसेजकडे मी लक्ष देत नाही. येल खुप हैराण झाली जेव्हा तिला समजले की, ती टायटल जिंकण्यात यशस्वी झाली आहे, कारण तिला हे सुद्धा माहित नव्हते की, तिने यावर्षी स्पर्धेत भाग घेतला आहे.

2017 मध्ये येलचे स्थान या लिस्टमध्ये 14वे होते. तर 2018 मध्ये ती तिसर्‍या स्थानावर पोहचली होती. तर 2019 मध्ये ती आणखी एक पायरी चढत दुसर्‍या स्थानावर पोहचली होती. या अ‍ॅवॉर्डचे फाऊंडर ब्रिटिश फिल्म क्रिटिक टीसी कँडलर आहेत. या लिस्टमध्ये मॅरियन कोटिलॅर्ड आणि जोर्डन डन सारख्या सेलेब्स सुद्धा पहिल्या स्थानावर होत्या.