जॉब सोडून आपली छायाचित्रे विकू लागली मॉडल, म्हणाली – ‘यावर्षी ब्रिटनच्या PM पेक्षा जास्त कमावणार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  ब्रिटनची 24 वर्षांची मॉडल आलिया मर्सीडिजचा दावा आहे की, यावर्षी ती ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यापेक्षा जास्त कामाई करणार आहे. आलिया त्या अतिशय निवडक लोकांपैकी एक आहे, ज्यांच्यासाठी कोरोना व्हायरस वरदान ठरला आहे. कारण लॉकडाऊननंतर तिच्या कमाईत जबरदस्त वाढ दिसून येत आहे.

ब्रिटनच्या स्किप्टन, वेस्ट यॉर्क्समध्ये राहणार्‍या आलियाने द सन वेबसाइटसोबत केलेल्या चर्चेत म्हटले की, तिने जेव्हा ग्राफिक डिझायनिंगमध्ये ग्रॅज्युएशन केले होते तेव्हा ती खुप कमी पैसे कमावत होती. कोरोना व्हायरसमुळे तिला घरातूनच काम करण्याची संधी मिळाली आणि यानंतर तिने एक प्रसिद्ध वेबसाइटवर आपली छायाचित्रे विकण्यास सुरूवात केली.

नंतर आलियाने आपला ग्राफिक डिझायनिंगचा जॉब सोडला आणि ती या वेबसाइटवर खुप प्रसिद्ध होऊ लागली आणि ती स्वत:चा प्रेक्षक वर्ग या वेबसाइटवर वाढवण्यात यशस्वी ठरली. आलियाने म्हटले की, ती यावर्षी जवळपास दिड लाख पाऊंड म्हणजे सुमारे दिड करोड रूपये कमावणार आहे आणि आलियाच्या आई-वडिलांना तिच्या या प्रोफेशनबाबत काही माहिती सुद्धा नाही.

आलियाने हा सुद्धा दावा केला की, ब्रिटनच्या पीएमपेक्षा यावर्षी ती जास्त पैसे कमावू शकते. तिने म्हटले की, हे आश्चर्यकारक आहे आणि सोबतच खुप फनी सुद्धा आहे, कारण जर माझ्याशी तुलना केली गेली तर आमच्या पीएमला अनेक गुंतागुंतीच्या आव्हानांचा सामना करावा लागतो.

आलियाला या वेबसाइटवर फॅन्सच्या अनेकप्रकारच्या विचित्र रिक्वेस्टचा सुद्धा सामना करावा लागत आहे. या वेबसाइटवर काही लोकांना तिच्या पायांची छायाचित्रे जास्त पसंत आहेत. कोरोना व्हायरस महामारीनंतर अनेक मॉडल्स नोकरी गेल्याने या वेबसाइटकडे वळल्या आणि सर्वाइव्ह करण्यात यशस्वी झाल्या आहेत.