सोशल मीडियावर खुपच बिनधास्तपणे ‘बोल्ड’ व्हिडीओ शेअर करत होती महिला, नवर्‍यानं गोळया घालून मारलं अन् केली आत्महत्या

ब्रासिलिया : सध्या सोशल मीडियावर आपण आपल्या प्रत्येक क्षणांची, ठिकाणांची माहिती शेअर करत असतो. पण याच सोशल मीडियामुळे अनेकदा वाद निर्माण झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केल्यामुळे एका पतीने त्याच्या पत्नीची गोळी झाडून हत्या केली.

सोशल मीडियामुळे बहुतांशजण जवळ आले आहेत. पण याच सोशल मीडियावर एका महिलेने स्वत:चे बोल्ड व्हिडिओ शेअर केले होते. ही बाब तिच्या पतीला समजल्यानंतर तिच्या पतीचा संतापाचा पारा चांगलाच चढला. या संतापाच्या भरात त्याने तब्बल 14 वेळा गोळी मारून त्याच्या पत्नीची हत्या केली. ही घटना ब्राझीलमध्ये घडली.

एलेन फेरेरा सियोलीन ही 35 वर्षीय महिला सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असायची. ती अनेकदा स्वत: फोटो आणि व्हिडिओ टिकटॉक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत असायची. एलेनेचे हे वागणे तिचा पती एलेजांद्रो एंटोनिया एग्युलेरा याला आवडत नसे. त्यातच तिने टिकटॉकवर बोल्ड व्हिडिओ टाकल्यानंतर या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. यामध्ये एंटोनियोने फेरेरा हिच्यावर 14 गोळ्या झाडल्या. त्यानंतर स्वत: डोक्यावर गोळी मारून आत्महत्या केली.