केरळ, पंजाब नंतर आता राजस्थानच्या विधानसभेत पास झाला CAA विरोधात प्रस्ताव

जयपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) वरून केंद्र सरकार आणि विरोधक यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र होत चालला आहे. काँग्रेस पक्षाचे बहुमत असलेल्या पंजाब विधानसभेत कायद्याच्या विरोधात ठराव मंजूर झाला. केरळ विधानसभेतही कायद्याला विरोधच झाला.

राजस्थान विधानसभेत आज शनिवारी सीएए विरोधात प्रस्ताव मांडण्यात आला आणि बहुमताने मंजूर झाला. ठरावावरील मतदानाच्या वेळी भाजपच्या आमदारांनी कायद्याच्या समर्थनाच्या घोषणा दिल्या.
काँग्रेस पक्षाचे बहुमत असलेल्या पंजाब आणि राजस्थान विधानसभेत कायदाविरोधी ठराव झाले, काँग्रेसचे बहुमत असलेली अन्य राज्ये आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर स्थापन झालेले महाराष्ट्र सरकार यांच्या निर्णयाकडे लक्ष आहे. मात्र, राज्य सरकारांच्या सीएए विरोधी भूमिकेवरून कॉंग्रेस पक्षात मतभेद आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like