धुळे : ट्रकच्या धडकेत मोटरसायकल स्वार ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील बहिरम कुटुंबियावर धुळीवंदन सणाच्या दिवशीच काळाने घात केला. गुरवारी दुपारच्या वेळी पिंपळनेरहून धोंगडे गावाकडे जाताना वळण रस्त्यावर नाशिकहुन पिंपळनेरकडे येणारा ट्रक (आर.जे.07 ग.ड 7595) ने मोटरसायकलला समोरासमोर धडक दिली. त्यात भजन हिरामण बहिरम ठार झाले.

हि बातमीत पोलीसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.  मयत भजन हिरामण बहिरम (वय.29) यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामिण कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला .

यावेळी रस्तावरील वाहतुक काही काळ ठप्प झाली होती. दोन्ही वाहने पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. नातेवाईक दामु उखडु बहिरम यांनी दिलेल्या लेखी तक्रारी नुसार ट्रक चालका विरुध्द पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.