‘येरवडा जेल’ हल्ला प्रकरण : मोहम्मद नदाफ ‘खतरनाक’ गुन्हेगार, सांगलीत तीन खुनासह २२ गुन्हे दाखल, प्रकृती चिंताजनक : सूत्रांची माहिती

सांगली / पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील येरवडा कारागृह हल्ल्यात गंभीर जखमी झालेला गुंड मोहम्मद जमाल नदाफ सांगली जिल्ह्यातील खतरनाक गुन्हेगार आहे. त्याच्यावर तीन खुनांसह तब्बल 22 गंभीर गुन्हे सांगली जिल्ह्यात नोंद आहेत. दरम्यान बुधवारी त्याच्यावर हल्ला झाल्यापासून सांगली जिल्ह्यात त्याच्या मृत्यूची चर्चा होती.

पुण्यातील येरवडा कारागृहात हिंदू राष्ट्र सेनेचा कट्टर समर्थक तुषार हंबीर याच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी मोहम्मद उर्फ म्हमद्या नदाफ याच्यावर खुनी हल्ला करण्यात आला. यामध्ये तो गम्भीर जखमी झाला आहे. त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान म्हमद्या नदाफ वर सांगली जिल्ह्यात 22 गम्भीर गुन्हे दाखल आहेत. नोव्हेंबर 2015 खंडणीच्या गुन्ह्यात साक्षीदार असलेल्या गोरखनाथ उर्फ मनोज माने याचा पोलिस बंदोबस्त असतानाही त्याचा खून केला होता. त्यानंतर दोन महिने म्हमद्या पसार होता. नंतर त्याला “फरार’ घोषित करत त्याला पकडण्यासाठी बक्षीस ची रक्कम ही पोलिसांनी जाहीर केली. नंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांनी त्याला कर्नाटक येथे पकडले. त्यानंतर सन त्यानंतर तत्कालीन पोलिस अधीक्षक सुनील फुलारी यांनी त्याच्यासह 20 जणांवर मोकाची कारवाई केली होती. तेव्हापासून तो कारागृहात होता.

2005 मध्ये रॉकेल वितरक सुभाष पुजारी याचा शिंदे मळ्याजवळील रेल्वे पुलाखाली निर्घृण खून करून म्हमद्या गुन्हेगारी पटलावर आला. त्यानंतर त्याने संजयनगर आणि कुपवाड परिसरात आपले टोळके तयार केले. या परिसरातील गुंड विठ्ठल शिंदेच्या टोळीशी त्याचा काही काळ संघर्ष राहिला. विठ्ठलच्या खुनानंतर त्याचा साथीदार मध्या वाघमोडे उदयास आला. पुन्हा मध्याच्या टोळीशी संघर्ष सुरू राहिला. पॅरोलवर सुटून आलेल्या विजय पवारच्या खुनाचा कट रचल्याबद्दल म्हमद्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला. नंतर त्याने दुर्गेश पवारवर खुनी हल्लाही केला. तीन खून, खुनी हल्ला, आर्म ऍक्‍ट, खंडणीसह तब्बल २२ गुन्हे दाखल असलेला म्हमद्यावर दाखल आहेत.

कुख्यात गुंड श्वेतांग निकाळजेसह हिंन्दुराष्ट संघटनेच्या ५ कार्यकर्त्यांनी आज मोहम्मद उर्फ म्हमद्या नदाफ याच्यावर येरवडा जेलमध्ये हल्ला चढवला आहे. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या म्हमद्यावर पुण्यातील ससून रुग्णालायात उपचार सुरु असून त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

बाळासाहेब आंबेडकर यांची मुंबईत आज पत्रकार परिषद ,विधानसभेबाबत करणार मोठा खुलासा

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती