Charge devices | घामाने तयार होईल 24 तास वीज, फोन सुद्धा होऊ शकतो चार्ज : रिसर्च

नवी दिल्ली : वृत्त संस्था – काही संशोधकांनी हातात घालता येणार्‍या एका अशा यंत्राचा शोध लावला आहे की जे कोणत्याही व्यक्तीच्या घामाचा वापर करून त्याद्वारे वीज (Electricity) तयार करू शकते. संशोधकांनी दावा केला आहे की, हे यंत्र बोटांवर लावता येऊ शकते आणि नंतर ते बोटांची आद्रता शोषून त्यापासून वीज (Electricity) बनवते. फिंगर टिप्सवर (Finger tips) खुप घाम येतो अशावेळी स्मार्ट स्पॉन्ग मटेरियलच्या (Smart spongy material) आधाराने हा घाम जमा केला जाऊ शकतो आणि कंडक्टर्सद्वारे यावर प्रोसेस केली जाते. Charge devices |  a new hand wearing device can generate electricity through fingers sweat and charge devices

हा प्रोटोटाईप डिव्हाईस सध्या खुप कमी वीज तयार करत आहे आणि तो तीन आठवड्यांपर्यंत हातात घातल्यानंतर एका स्मार्टफोनला चार्ज (Smartphone charging) करण्यालायक वीज उत्पन्न करत आहे परंतु युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या (University of California) डेव्हलपर्सला आशा आहे की भविष्यात याच्या क्षमतेत खुप जास्त वाढ केली जाऊ शकते.

बहुतांश हातांवर घातल्या जाणार्‍या यंत्रात वीज जनरेट  (Power generated) करण्यासाठी खुप मेहनत करावी लागते ज्यामध्ये एक्सरसाईज, (Exercise) रनिंग (Running) आणि स्पोर्ट्ससारख्या (Sports) हालचालींच्या आधारे जास्तीत जास्त घाम घालवण्याचा प्रयत्न केला जातो परंतु या टेक्नॉलॉजीमध्ये (Technology) असे नाही.

सीनियर प्रोफेसर जोसेफ वॉन्ग (Senior Professor Joseph Wong) यांनी म्हटले की, फिंगरच्या टिपवर जर तुम्ही काहीही करत नसाल तरी थोड्या प्रमाणात घाम असतो, या टेक्नॉलॉजीच्या आधाराने तुम्ही कोणतीही मेहनत न करता वीज जनरेट करू शकता.
यास इन्व्हेस्टमेंटवर मॅक्सिमम एनर्जी रिटर्न (Maximum energy return on investment) म्हटले जाते.

या प्रयोगात फिंगर चार्जरला एका केमिकल सेंसरने (Chemical sensors) आणि एका छोट्या लो-पॉवर स्क्रीनने कनेक्ट करण्यात आले होते.
यास केवळ दोन मिनिटापर्यंत घातल्याने इतकी पॉवर जनरेट होत होती ज्यामुळे सेन्सर आणि स्क्रीन चालवली जाऊ शकत होती.

Web Title : Charge devices |  a new hand wearing device can generate electricity
through fingers sweat and charge devices

हे देखील वाचा

Pankaja Munde | पंकजा मुंडेंच्या समर्थनासाठी गर्दी करणार्‍यांवर आयोजकांसह
43 नेते आणि 120 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Pregnancy Bible | करीना कपूर-खान विरोधात बीडमध्ये पोलिसांत तक्रार दाखल

Piyush Goyal | रेलवेमंत्री पदावरून पायउतार झालेल्या पियूष गोयल
यांच्यावर भाजपानं सोपवली मोठी जबाबदारी, दिलं प्रमोशन