सूर्याच्या हानिकारक यूव्ही किरणांपासून वाचण्यासाठी Sunscreen चे काम करतात द्राक्ष, स्टडीत दावा

नवी दिल्ली : व्हिटॅमिन सी, के आणि अँटीऑक्सिडेंट्स भरपूर असल्याने द्राक्ष हार्ट हेल्थसह ब्लड शुगर लेव्हल कमी करून डायबिटीज नियंत्रणात ठेवतात. अनेक प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. विशेष म्हणजे सूर्याच्या हानिकारक यूव्ही किरणांमुळे होणार्‍या स्किन डॅमेजपासून सुद्धा द्राक्ष तुम्हाला वाचवू शकतात. असा दावा एका नवीन स्टडीमध्ये करण्यात आला आहे. जर्नल ऑफ अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मेटॉलजीमध्ये मनुष्यांवर झालेला हा स्टडी प्रकाशित करण्यात आला आहे.

हे आहेत द्राक्ष सेवनाचे फायदे

सनबर्न आणि यूवी डॅमेजपासून बचाव
स्टडीत म्हटले आहे की, द्राक्ष सेवन केल्याने हानिकारक यूव्ही किरणांमुळे त्वचेची जी हानी होते त्यापासून बचाव होतो. द्राक्ष सेवनाने सेल्युलर लेव्हल म्हणजे पेशीच्या स्तरावर यूव्ही डॅमेज तसेच उन्हामुळे सनबर्नविरूद्ध शराराचे रेजिमेंट्स म्हणजे प्रतिबंध द्राक्ष वाढवते.

यात पॉलिफेनॉल्स नावाचे नैसर्गिक तत्व असते ज्यामुळे त्वचेला यूव्ही डॅमेज विरूद्ध फायदे मिळतात. यूकेच्या बर्मिंगहम येथील युनिव्हर्सिटीत ऑफ अलाबामामध्ये हा स्टडी करण्यात आला होता ज्यामध्ये सहभागी सदस्यांनी 14 दिवसांपर्यंत रोज 2.25 कप द्राक्षाएवढी होल ग्रेप पावडर खाण्यास दिली. यूव्ही लाईटबाबत या लोकांची प्रतिक्रिया कशी होती हे द्राक्ष खाल्ल्यानंतर मोजले गेले.

स्किन कॅन्सरपासून बचाव
स्किन बायोप्सीमध्ये समजले की, द्राक्ष सेवन केल्याने डीएनएला होणार्‍या नुकसानीत घट झाली, त्वचेच्या पेशींच्या मृत्यू दर कमी झाला आणि इन्फ्लेमेटरी मार्कर्ससुद्धा कमी झाले, जे त्वचेशी संबंधीत आजार आणि स्किन कॅन्सरचे कारण बनले. द्राक्ष सनस्क्रीन सारखे काम करते जे यूव्ही डॅमेजपासून वाचवण्यासाठी उपयोगी आहे.