धक्कादायक… ९ वर्षाच्या चिमुरडीला पाण्याच्या टँकरने चिरडले

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मराठवाड्यामध्ये दुष्काळाची परिस्थीती गंभीर असून ग्रामीण भागातील नागरिकांना हांडाभर पाण्यासाठी झगडावे लागत आहे. ग्रामीण परिसरात प्रशासनाकडून पाण्याच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. आज दुपारी बाराच्या सुमारास औरंगाबाद शहरातील जयभवानीनगर परिसरात एका नऊ वर्षाच्या चिमुरडी पाण्याच्या टँकरखाली चिरडली गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
नेहा गौतम दंडे असे मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नेहा दंडे ही जयभवानीनगर येथे राहणा-या बहिणीकेड आपल्या आईसोबत पाहुणी म्हणून आली होती. तिच्या मृत्यूमुळे दंडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहा जवळच्या दुकानात आईस्क्रीम आणण्यासाठी गेले होती. आईस्क्रीमचा कोन घेऊन दुकानातून बाहेर पडली आणि त्याचवेळी मनपाचा पाण्याचा टँकर तेथून जात होता. अर्धवट भरलेला टँकर गल्लीतून जात असताना अचानक मागे आला आणि नेहा टँकरच्या मागील चाकाखाली आली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या नेहाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर टँकर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.