‘या’ नवीन तंत्रज्ञानामुळे ई-वाहने धावणार ८०० किमीपर्यंत

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – वाढते शहरीकरण,औद्योगिकरणामुळे दिवसागणिक रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या अन् त्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या समस्या हे एक दुष्टचक्र आहे. त्यावर इलेक्ट्रिक वाहन हा नवीन उपाय पुढे आला आहे.

इलेक्ट्रिक वाहने बनवण्यासाठी जवळपास सर्वच कंपन्या सरसावल्या आहेत. विजेवर चालणारी वाहने यामध्ये नवनवीन  तंत्रज्ञान शोधले  जात आहेत. आता विजेवर चालणारी वाहने एकदा चार्ज केल्यानंतर ८०० किमी अंतराचा पल्ला गाठणार आहेत. वैज्ञानिकांनी अशा अनेक द्विआयामी वस्तू विकसित करण्याचा दावा केला आहे.

अमेरिकेतील इलिनोइस विद्यापीठातील संशोधकांच्या म्हणण्यानुसार, लिथिअम-एअर बॅटरी सध्याच्या काळात वापरात येणाऱ्या लिथिअम-आयन बॅटरीच्या तुलनेत १० टक्के अधिक उर्जा निर्माण होणार आहे. ही उर्जा वजनाने हलकी आहे. वास्तविकपणे याला विकसित करण्याची प्रक्रिया सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे.
या शोधामध्ये वैज्ञानिकांनी अशा अनेक टू-डी वस्तूंचे संश्लेषण केले, जे उत्प्रेरक म्हणून कार्य करते. अशाप्रकारे पारंपारिक उत्प्रेरकांनी मिळून तयार करण्यात आलेल्या लिथिअम-एअर बॅटरीच्या तुलनेत या उत्प्रेरकांपासून तयार झालेली बॅटरी १० टक्के अधिक उर्जा संग्राहित करू शकते. हे संशोधन अॅडव्हान्सड मटेरिअल्स पत्रिकेत प्रकाशित झाले आहे.
या तंत्रज्ञानाने बॅटरीची क्षमता वाढविणार –
लिथिअम एअर बॅटरी अधिक प्रभावी आहे. तिच्यात द्विआयामी वस्तूंपासून तयार होणाऱ्या उन्नत उत्प्रेरकांचा (अॅडवान्स्ड कॅटलिस्ट्सचा) यात समावेश आहे. तसेच यामुळे अधिक चार्जिंग उपलब्ध होणार आहे असे वैज्ञानिकांचे मत आहे. या उत्प्रेरक बॅटरीच्या आत होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेमुळे (केमिकल रिअॅक्शनचा) वेग वाढण्याची शक्यता आहे. ज्या प्रकारच्या पदार्थांपासून हे उत्प्रेरक तयार झाले आहेत. त्यांच्या आधारावर उर्जा संग्राहित करणे आणि बॅटरीची क्षमता वाढविण्यासाठी हे उत्प्रेरक सहाय्यक ठरणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us