मुलगा आतंकवादी असल्याच्या संशयानं कुटुंब ‘विभक्त’ झालं, वडिल ‘पाकिस्तान’मध्ये तर मुलं भारतात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मोहम्मद सुल्तान रिंद (75) पाकिस्तानच्या सिंध प्रांतात नुशेरो फिरोज जिल्ह्यामध्ये राहतात. त्यांचे कुटुंब मात्र मुंबईत राहते. त्यांची पत्नी भारतीय आहे मात्र मुलावरील संशयामुळे त्यांना भारतीय नागरिकता मिळू शकलेली नाही. मुलगा दहशतवादी ISI या संघटनेशी जोडला गेलेला असल्याच्या संशयाने त्यांना भारतीय नागरिकता मिळू शकलेली नाही. आता हे वडील 45 दिवसांचा व्हिजा काढून कुटुंबाला भेटण्यासाठी भारतात आलेला आहे.

म्हाताऱ्या पतीसोबत रहायचे आहे पत्नीला
यापूर्वी मोहम्मद सुलतान 2016 मध्ये भारत दौर्‍यावर आले होते. यापूर्वी 2015 मध्ये त्याचा मुलगा अयाज सुलतान आयएसआयमध्ये सामील झाल्याच्या बातम्या आल्या. अयाज आणि इतर दोन मुलं मुंबईहून सीरियाला गेले. तेव्हापासून तो बेपत्ता होता. शेवटच्या वेळी रिंद मुंबईत आले तेव्हा त्यांनी भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश मिळू शकले नाही.

कुवेतमध्ये शेफ आहे रिंद
रिंद 45 वर्षांपासून कुवेतमध्ये आहेत. यावेळी त्यांची भेट जुबैदा(सासू) सोबत झाली आणि मग ते तिच्यासोबत 1979 मध्ये मुंबईतील सांताक्रूझ येथे आले आणि त्यांनी जुबैदाची मुलगी रजिया सोबत विवाह केला आणि ते परत कुवेतला निघून गेले. त्यानंतर ते आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी अधून मधून मुंबईत येत असे. त्यांना चार मुलं आहेत. मुलगा ISI मध्ये सामील झाल्याच्या बातम्या ऐकल्यानंतर ते भारतात पोहचले मात्र त्यांना याबाबत अनेकांचे बोलणे ऐकावे लागले.

अयाजमुळे बनू शकला नाही इरफानचा पासपोर्ट
रिंदचा दुसरा मुलगा इरफान यालाही आपल्या भावामुळे त्रास झाला आहे. अयाज पळून गेल्यापासून तो पोलिसांच्या देखरेखीखाली आहे. नोकरीसाठी इरफानला परदेशात जायचे आहे, परंतु त्याचा पासपोर्ट रिन्यू होत नाही. इरफान देखील आपल्या भावासारखे ISI मध्ये जॉइन होऊन पैसे कमावणार आहे अशा प्रकारची बोलणी त्याला वारंवार पोलिसांकडून ऐकायला मिळतात.

अयाजच्या जाण्यानंतर हे कुटुंब आता मालाडमध्ये राहायला आले आहे. रजिया म्हणाली की अयाज कॉल सेंटरमध्ये काम करायचा. प्रेमात असलेल्या एका मुलीने त्याचा विश्वासघात केला होता. यानंतर त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता. रजियाने कबूल केले की तिच्या मुलगा इंटरनेटद्वारे ब्रेन वॉश झाला होता. घराबाहेर पळून गेल्यानंतर त्याने घरच्यांशी पुन्हा संपर्क साधला नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/