इंधन दरवाढीला वैतागून या व्यक्तीने तयार केली पाण्यावर चालणारी कार  

सुरत : वृत्तसंस्था- दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडत असताना सुरतमधील अभियंता पुरुषोत्तमभाई पिपलिया यांच्यावर या दरवाढीचा परिणाम होत नाही. कारण ते स्वत:ची मारुती ८०० कार पाण्यावर चालवत आहेत. सुरतमधील कतारगाममध्ये चारचाकी वाहनांचे वर्कशॉप चालविणाऱ्या ५७ वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअरचा दावा आहे की, त्यांनी स्वत:च पेट्रोलऐवजी हायड्रोजन गॅसवर कार चालविण्याचा फार्म्यूला तयार केला होता. त्यांच्या कारमध्ये पाण्याची टाकी असते. या पाण्यातून हायड्रोजन गॅस तयार होतो. आणि कार चालते. इतर पेट्रोल कारच्या तुलनेत दुपटीहून अधिक सरासरी धावते व यासाठी इतर खर्च अजिबात लागत नाही. यामुळे वायू प्रदूषणही होत नाही. मात्र, कार सुरू करताना व बंद करताना याला पेट्रोल लागते, तेही नाममात्र. तेही ऑटो ऑपरेटेड केलेले आहे.

ते म्हणाले, ‘कार रन बाय वॉटर’ या नावाने पेटंट केलेले आहे. त्याची प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे. याआधी त्यांनी डिझेल व इंजिन पाण्यावर चालवणे आणि मायलेज ४० टक्के वाढविण्याचे दोन पेटंट मिळवलेले आहेत. पाण्यावर चालणारी कार आतापर्यंत ५० हजार किमी धावली आहे. आता ते चांगल्या अ‍ॅटोमोबाइल कंपनीच्या चांगल्या ऑफरच्या शोधात आहेत. अशा प्रकारची कार सर्वसामान्यांनाही चालवता यावी, असा त्यांचा उद्देश आहे. लवकरच यासाठी ऑफर येईल, अशी त्यांना आशा आहे.

या प्रक्रियेतून पाण्यातून निघते हायड्रोजन

पाण्याच्या टाकीला १२ व्होल्टची बॅटरी तांब्याच्या दोन तारांनी + – ला जोडलेली असते. पेट्रोलने एकदा इंजिन सुरू झाल्यानंतर पाण्यापासून हायड्रोजन तयार होण्यास सुरुवात होते. हायड्रोजनच्या दोन व ऑक्सिजनच्या एका रेणूपासून होणाऱ्या विघटनाच्या प्रक्रियेस इलेक्ट्रॉलिसिस म्हणतात. येथून तयार होणारे हायड्रोजन दुसऱ्या टाकीत जमा होऊ लागते. तेथून दाबानंतर कम्ब्युशन चेंबरमध्ये जाऊन ऊर्जा निर्माण होते. ती सिलिंंडर चालवते. हायड्रोजन साठून राहत नसल्याने स्फोटाचा धोका नाही.

इंधन महाग झाल्याने सुचली कल्पना

राजकोटचे पुरुषोत्तम पिपलिया यांच्या वडिलांचा व्यवसाय शेती आहे. पेट्रोल व डिझेलचे भाव वाढत चालल्याने पर्यायी इंधन शोधण्याची कल्पना आली. कार गॅसवर चालवण्यासाठी इंजिनचे क्रिटिकल पार्ट पिस्टन, सिलिंडर, टायमिंग आदी मॉडिफाय करावे लागले. यात दहा वर्षे गेली. पाण्याच्या विघटनातून तयार होणाऱ्या हायड्रोजनमुळे प्रदूषण निम्म्याने कमी होते. कोणतेही साधे पाणी वापरू शकता, परंतु आपण मिनरल वॉटर वापरतो