Coronavirus : पुण्यातील अग्नीशमन विभागातील ड्रायव्हरला ‘कोरोना’ची लागण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. राज्यात मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीय आहे. पुणे विभागातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 2800 च्या टप्प्यात जावून पोहचला आहे तर पुणे शहरात 2000 पेक्षा अधिक बाधित आहेत. दरम्यान, एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यातील अग्नीशमन दलातील एका ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

अग्नीशमन दलातील ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली असून त्याच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्यात आल्याचं अग्नीशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले आहे. दरम्यान, अग्नीशमन दलामधील ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानं प्रशासन सर्व संबंधितांना आणखी काळजी घेण्यास सांगत आहे.