‘तान्हाजी’ विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल, केला ‘हा’ गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या सिनेमाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. दिग्दर्शकांनी तान्हाजी मालुसरे यांचा खरा वंश सिनेमात दाखवावा असं आवाहन या याचिकेत करण्यात आलं आहे. याचिकेत म्हटलं आहे की, 10 जानेवारी रोजी रिलीज होणाऱ्या या सिनेमात राजकीय आणि व्यावसायिक हेतू साध्य करण्यासाठी तान्हाजींचा खरा वंश जाणून बुजून लपवण्यात आला आहे.

याचिकेत अशी विनंती करण्यात आली आहे की, तान्हाजी मालुसरे यांचा खरा वंश जर दाखवण्यात आला नाही तर न्यायालयानं सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनला (सीबीएफसी) या सिनेमाला प्रमाणपत्र न देण्याच्या सूचना द्याव्यात.

अखिल भारतीय क्षत्रिय कोळी राजपूत संघाकडून दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत आरोप लावण्यात आला आहे की, सिनेमाच्या निर्मात्यांनी चुकीच्या पद्धतीनं तान्हाजी हे मराठा समुदायाशी संबंधित असल्याचं दाखवलं आहे वास्तविक पाहता ते एक क्षत्रिय महादेव कोळी होते.

अखिल भारतीय क्षत्रिय कोळी राजपूत संघानं याचिकेत दावा केला आहे की, 10 जानेवारी रोजी पडद्यावर येणाऱ्या या सिनेमात राजकीय आणि व्यावसायिक फायदा मिळवण्यासाठी तान्हजी यांचा वंश जाणून बुजून लपवण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like