पर्यटकांसाठी स्वर्ग आहे हे ठिकाण, जाणून घ्या कधी आणि कसे जाऊ शकता?

दिल्ली : वृत्तसंस्था – पर्यटक हे नेहमीच पर्यटन स्थळाच्या शोधात असतात जे ठिकाण निसर्गरम्य आणि सुंदर आहे तिथे पर्यटकांनी कब्जा केलाच म्हणून समजा उत्तराखंडमधील लोकप्रिय हिल स्टेशन मसूरीपासून केवळ २४ किमी अंतरावर धनोल्ती हे आणखी एक सुंदर हिल स्टेशन आहे. पर्यटकांसाठी हे ठिकाण स्वर्ग मानलं जातं. या ठिकाणाची खासियत म्हणजे हे शहर अजून व्यावसायीकरणापासून दूर आहे. त्यामुळे निसर्गाचा आनंद घेता येतो.

धनोल्तीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरुन आनंदासोबतच निसर्गाच्या आणखी जवळ जाता येतं. महत्त्वाची बाब म्हणजे रोमांचक गोष्टी करण्याची आवड असणाऱ्यांसाठी इथे करण्यासाठी खूपकाही आहे. तुम्हालाही असंच काही करण्याची आवड असेल तर धनौल्तीच्या एपल ऑर्चर्ड रिसॉर्टमधील एडवेंचर पार्कमध्ये जा.

स्काय वॉक-जीप लाइन

ही येथील सर्वात रोमांचक एक्टिविटी पैकी एख आहे. स्काय वॉक करण्याचा आयुष्यात कधीही न विसरता येणार अनुभव घेता येईल. यात तुम्ही जमिनीपासून १२० उंचीवर बांधण्यात आलेल्या ३६० फूट लांब तारेवर चालू शकता. हा एक फारच थ्रिलिंग असा अनुभव असेल. यात घाबरण्यासारखं काही नाही कारण तुमच्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या व्यवस्था केलेल्या असतात. तर जिप लाइनमध्ये तुम्ही ६०० फूट खोल दरीवर बांधण्यात आलेल्या ताराच्या मदतीने तुम्ही एक टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाऊ शकता.
माउंटेन सफारी
जर तुम्हाला बाइक चालवण्याची आवड असेल तर इथे तुम्ही माउंटेन बायकिंगचा अनुभव घेऊ शकता. येथील डोंगरात बाइक चालवण्याचा हा अनुभव तुमच्यासाठी नक्कीच कधीही न विसरता येणारा असेल. हा पूर्ण प्रवास ६० किमीचा असेल ज्यात तुम्ही हिमालयाची सुंदरता, खोल दऱ्या आणि जंगलांमधून प्रवास करता.
ट्रेकिंग
इथे तुम्ही ट्रेकिंगचाही आनंद घेऊ शकता. १० हजार फूट उंच डोंगर, देवदारची उंचच झाडांमधून तुम्हाला ट्रेकिंग करायला मिळतं. ट्रेकिंगदरम्यान मदतीसाठी प्रशिक्षित एस्कॉर्टही असतात. इथे तुम्ही टॉप नीबा आणि सुरकंडा देवीच्या मंदिरापर्यंत ट्रेकिंग करु शकता.
कॅम्पिंग
शहराच्या गर्दीतून लांब काही दिवस तुम्ही इथे निसर्गाच्या सानिध्यात चांगला वेळ घालवू शकता. त्याहूनही खास बाब म्हणजे तुम्ही इथे खुल्या आकाशाखाली कॅम्पिंगही करु शकता. मोकळ्या आकाशाखाली टेंट्स लावून राहण्याची काही औरच मजा असते.
केव्हा जावे ?

धनोल्तीला फिरण्यासाठी जाण्याचा सर्वात चांगला कालावधी मार्च ते जून महिन्यातील मानला जातो. यावेळी येथील वातावरणा फार चांगलं आणि फिरण्या लायक असतं.
तिथपर्यंत पोहचण्याचा मार्ग 
विमान मार्गे – देहरादूनचं जोली ग्रांट विमानतळ हे तेथील सर्वात जवळील विमानतळ आहे. हे धनोल्तीपासून ८३ किमी अंतरावर आहे. विमानतळाहून टॅक्सीने तुम्ही धनोल्तीला पोहोचू शकता.
रेल्वे मार्गे – धनोल्तीपासून ८३ किमी अंतरावर ऋषिकेशचं रेल्वे स्टेशन आहे.
रस्ते मार्गे – ऋषिकेश, मसूरी, देहरादून आणि दिल्लीहून धनोल्तीला सतत बसेस सुरु असतात. किंवा तुम्ही प्रायव्हेट टॅक्सीनेही जाऊ शकता.
Loading...
You might also like