पश्चिम बंगालचा वारंवार ‘अपमान’ केला जात आहे : ममता बॅनर्जी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. राज्यपालांच्या आणि नरेंद्र मोदींच्या भेटीमुळे ममता चांगल्याच भडकल्या असून बंगालला गुजरात बनवण्याचा डाव आखण्यात आला आहे, असा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर महाविद्यालयात बसवण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की , ‘पश्चिम बंगालचा वारंवार अपमान केला जात आहे. त्यामुळे बंगाल आणि बंगालची संस्कृती धोक्यात आली आहे. जर तुम्हाला बंगाल आणि बंगालची संस्कृती वाचवायची असेल तर सर्वांनी एकत्र यायला हवे. बंगालला गुजरात बनवण्याचा डाव रचला जात आहे, बंगाल हा गुजरात नाही. मी गुजरातच्या विरोधात नाही मात्र, गुजरातमध्ये दंगल घडवणाऱ्यांच्या विरोधात आहे.’

लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान फोडण्यात आलेला ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा अर्थपुतळा पुन्हा एकदा ईश्वरचंद्र विद्यासागर महाविद्यालयात बसवण्यात आला. यावेळी ममता बॅनर्जी यांनी राज्यात राजकीय दंगे झाल्याचे मान्य केले. या दंग्यांमध्ये भाजपाचे दोनच कार्यकर्ते मारले गेले तर तृणमुल काँग्रेसच्या १० कार्यकर्त्यांचा यात मृत्यू झाला आहे अशी माहिती त्यांनी दिली.

आरोग्यविषयक वृत्त –

ठाण्यातील ६६ वर्षीय ब्रेनडेड महिलेचे अवयवदान

वजन कमी करण्याची ‘ही’ थेरपी करून पाहा

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका

झोपेत असताना कुणी छातीवर बसल्यासारखे वाटलेय का ?