ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कर्मचारी बडतर्फ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जामीनासाठी मदत करण्यासाठी २५ हजारांची लाच स्विकारणाऱ्या इंदापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. त्याचे वर्तन गुन्हेगारी व भ्रष्ट स्वरुपाचे असल्याने पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी त्याला ब़डतर्फ करण्याचा आदेश दिला आहे.

राहूल दत्तात्रय बढे (पोलीस शिपाई इंदापूर पोलीस ठाणे) असे बडतर्फ करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.

इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपींना जामीन मिळण्यासाठी मदत करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर ती स्विकारताना १५ मार्च रोजी त्याला अन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल बढे यांचे हे वर्तन गुन्हेगारी स्वरुपाचे भ्रष्ट वर्तन आहे. त्यामुळे राहूल बढे यांना सेवेतून बडतर्फ करण्याची शिक्षा देण्यात असल्याचा आदेश संदिप पाटील यांनी दिला आहे. भ्रष्ट वर्तन करणाऱ्या शासकिय सेवकांना कठोर शिक्षा देण्याची कार्यवाही करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना या वर्तनापासून अलिप्त राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.