कवायतीवरून परतणाऱ्या पोलिसाचा अपघात ; प्रकृती चिंताजन

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस मुख्यालयातील कवायत करून घराकडे परणाऱ्या पोलीस कर्माचाऱ्याचा घंटागाडीला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात पोलीस शिपाई गंभीर जखमी झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात आज (सोमवार) सकाळी शासकीय दुध डेअरी समोर झाला.

तुकाराम तुरटवाड असे गंभीर जखमी झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. तुकाराम तुरटवाड हे आज सकाळी पोलीस मुख्यालयातील कवायत संपवून घुंगराळा येथील घराकडे परत जात होते. त्यावेळी महापालिकेची घंटागाडी अचानक समोर आल्याने त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी घंटागाडीवर जाऊन आदळली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तुरटवाड यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय सुत्रांनी सांगितले.

अपघाताची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलीस निरीक्षक पंडीत कच्छवे, वाहतुक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नाईक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात धाव घेतली.

आरोग्यविषयक वृत्त