PHOTO : पोलिस निरीक्षकाकडून अ‍ॅन्टी करप्शनच्या कर्मचार्‍यावर फायरिंग, ACBचा पोलिस कर्मचारी गंभीर जमखी

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पिंजर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर नागलकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यावर गोळी झाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार आज सायंकाळी पाचच्या सुमारास घडला असून यामध्ये सचिन धात्रक हा एसीबीचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक नागलकर हे वादग्रस्त पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्यावर वरिष्ठ स्तरावर अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. आज सायंकाळी त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई होणार होती. कारवाई होणार असल्याची चिन्ह दिसताच नागलकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यावर स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉलवरमधून गोळी झाडली. यामध्ये सचिन धात्रक हे गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे पोलीस अधीक्षक एम राकेश कलासगार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पिंजर येथे रवाना झाले.

आरोग्य विषयक वृत्त-
‘या’ कारणामुळे सकाळी उठल्यावर मोबाईलचा वापर शक्यतो टाळाच
धक्कादायक ! भारतीयांचं वयोमान वायू प्रदूषणामुळे तब्बल ‘एवढ्या’ वर्षांनी झाले कमी
यामुळे कारणांमुळें वाढत महिलांचं वजन