‘ये भगवा रंग’ भक्ती गीतांत धुळेकर तल्लीन

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – गणेश उत्सवानिमित्त शहरात सोमवारी सायंकाळी ८ ते १० वाजण्याच्या दरम्यान भाजप पक्षाच्या वतीने ख्यातनामा गायिका शहनाज अख्तर यांच्या भक्ती गीतांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शहनाज यांनी प्रथम गणेश वंदना व नंतर माॅ शेरावाली, कृष्णलीला गाण्याचे गायन करत धुळेकरांना भक्तीमय वातावरणात रंगविले. भक्तीगीत कार्यक्रमाच्या दरम्यान पाऊस येत होता. तरिही धुळेकर भक्तीगीते ऐकण्यात तल्लीन झाले होते. ‘ये भगवा रंग’ गीताला धुळेकरांनी उर्स्फुतपणे दाद दिली. या कार्यक्रमाचे आयोजन भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी केले होते. यावेळी भक्ती संध्या गीतांमुळे गणेशोत्सवात हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन झाले.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like