विद्यार्थीनीला संमोहित करून प्रोफेसर बनवत होता व्हिडिओ, म्हणाला – ‘मागील जन्मात आपण होतो लव्हर्स’

नवी दिल्ली : एका लोकप्रिय सायकोलॉजिस्टवर एका युनिव्हर्सिटीच्या काही विद्यार्थीनींवर संमोहन तंत्राचा वापर करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. रिपोर्टनुसार डॉ. वसीम अलादीननेआपल्या एका विद्यार्थीनीला आकर्षित करण्यासाठी म्हटले की ते दोघो मागील जन्मात कपल होते आणि या प्रोफेसरवर आणखी काही विद्यार्थीनींना सुद्धा संमोहित केल्याचा आरोप आहे.

अलादीन एक सायकॉलॉजिस्ट आहे आणि तो एक टॉप रँकिंग युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चरर सुद्धा आहे. हेल्थ अँड केयर प्रोफेशनल ट्रिब्यूनल सर्व्हिसला मिळालेल्या रिपोर्टनुसार, या युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थीनीने अलादीनचे क्लासेस जॉइन करण्याचा निर्णय घेतला होता, कारण तिला इतर प्रोफेसर्सपेक्षा तो वेगळा वाटत होता. या मुलीशिवाय इतरही मुली होत्या ज्या प्रोफेसरला भेटू लागल्या आणि सर्वांनी मिळून एक ग्रुप बनवला ज्याचे नाव होते ’एप्रेंटिस क्लब’.

पुढील वर्षाच्या आत या प्रोफेसरने आपल्या बोलण्यात अडकवून या विद्यार्थीनींना अँटी डिप्रेसिव्ह औषधे घेण्यास मनाई केली आणि त्याऐवजी संमोहन करणार्‍या प्रक्रियेवर फोकस करण्यास सांगितले. अलादीनने या विद्यार्थीनीला संमोहित करण्याचा विचार केला होता आणि नंतर प्रोफेसरने तिच्या चेहर्‍यावर फूलाचा स्पर्श केला होता, आणि तिचे फोटो घेतले होते आणि तिला हे सुद्धा सांगितले होते की, मागच्या जन्मात आपण लव्हर्स होतो आणि ते 600 वर्षापासून याची वाट पहात होते.

जेव्हा विद्यार्थीनीला अस्वस्थ वाटू लागले तेव्हा प्रोफेसरने असे सुद्धा म्हटले की, जे त्याला हवे आहे, ते द्यावे नाहीतर त्याच्या प्रतिक्षेत आणखी पाच विद्यार्थीनी आहेत. अलादीनवर आरोप आहे की, त्याने आणखी एका विद्यार्थीनीला संमोहित केले होते आणि आपल्या फोनमध्ये या सेशनचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि त्याने म्हटले होते की, तिचे आतील सौंदर्य उजळून बाहेर येत आहे. या विद्यार्थीनीचे म्हणणे होते की, संमोहन करण्याच्या दरम्यान प्रोफेसरने तिच्या डोक्याचा मसाज केला आणि हे रेकॉर्डसुद्धा केले.

प्रोफेसरच्या या प्रकारांनी वैतागलेल्या विद्यार्थीनींनी त्याच्याशी चर्चा केली असता त्यांना समजले की, प्रकार काय आहे. मात्र, अलादीनने या विद्यार्थीनींमध्ये सुद्धा फूट पाडण्याचा प्रयत्न केला.

यानंतर एका विद्यार्थीनीने युनिव्हर्सिटीच्या स्टूडंट अ‍ॅडव्हाइस सर्व्हिसमध्ये या प्रोफेसरची तक्रार केली. तर अलादीनने दावा केला की, त्याने कोणत्याही विद्यार्थीनीला संमोहित केले नाही. उलट त्यांना सेल्फ हिप्नोसिस म्हणजे आत्म संमोहनाचे तंत्र शिकवत होतो. परंतु, हे कोणत्याही विद्यार्थीनीला माहित नव्हते.

या प्रकरणी ट्रिब्यूनलने म्हटले की, आमच्याकडे बलात्काराची तक्रार आलेली नाही, परंतु या प्रोफेसरच्या काही हालचाली अशा आहे ज्यावर गंभीर शंका येऊ शकते. त्याच्या या प्रकारामुळे दोन विद्यार्थीनींच्या मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम झाला आहे. म्हणून त्यास युनिव्हर्सिटीतून हटवण्यात येत आहे.