महाबळेश्वरमध्ये पुण्यातील व्यक्तीचा मृत्यू

महाबळेश्वर : पोलीसनामा ऑनलाइन – कुटुंबासह महाबळेश्वर जवळील तापोळा येथे पर्यटनासाठी आलेल्या अबीर गोलकधन मुखर्जी, वय ३९ (रा. मारवेल, आयसोला, एनआयबीएम रोड, पुणे) या पर्यटकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. याबाबतची खबर मृताची पत्नी रिना अबीर मुखर्जी यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दिली.

पुणे येथून अबीर मुखर्जी व तरूणकुमार घनश्यामदास गोयल हे आपल्या कुटुंबासह नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर येथे आले होत. दोन कुटुंबीय दुपारी दोनच्या दरम्यान तापोळा येथील एका हॉटेलमध्ये पोहचली. रात्रीच्या जेवणानंतर आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी गेले. सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अबीर मुखर्जी यांच्या पत्नी रिना मुखर्जी यांनी अबीर याना उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र येथील दवाखान्यात नेण्यात आले. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात नेल्याचा सल्ला दिला. या ठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आले.