विना हेल्मेट दुचाकी चालविणे पडले १२ हजार ४०० रुपयांना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात विना हेल्मेट दुचाकी चालविणे तरुणाला चक्क १२ हजार ४०० रुपयांना पडले. तरुणाने अनेकदा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने असलेल्या थकित दंडाची पोलिसांनी वसूली केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी १२ हजार ४०० रुपयांचा दंड वसून केला आहे.

शहरात पुणे पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना लक्ष्य केले आहे. हेल्मेटसक्ती, सिग्नल मोडणारे आणि इतर वाहतुकीचे नियम मोडणारे यांच्यावर कारवाईसाठी कंबर कसली आहे. दरम्यान काही महिन्यांपुर्वी पुण्यात हेल्मेट सक्तीची कडक अंमलबजावणी सुरु आहे. दरम्यान पुणे पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना लावण्यात आलेला दंड ते भरत नसल्याने पेंडींग दंडाची रक्कम वसूल करण्याची मोहिम सुरु केली आहे.

वाहतुक पोलिसांनी एका तरुणाला अडवले. त्याच्या गाडीवर असलेल्या दंडाची तपासणी केली. तेव्हा त्याच्यावर विविध २५ प्रकारचे ईचलानचा पेंडींग दंड १२ हजार ४०० रुपये असल्याचे समोर आले. त्यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी संपूर्ण दंड वसूल केला आहे.

तर आठवड्यापुर्वी पुण्यातील एका फॉर्चूनरचालकाला थांबवून लष्कर वाहतुक पोलिसांनी तब्बल २४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला होता.