कचरा जाळल्याचा राग येऊन शेजारी असलेल्या व्यवसायिकाच्या दुकानात दगडफेक करत केली तोडफोड

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन –  कठिण प्रसंगी प्रथम आपल्या शेजारीच राहणारे मदत करतात व नंतर नातेवाईक परंतु वाडिभोकर रोड विजय पोलीस कॉलनी परिसरात शेजारीच जिवावर उठला हि एक वेगळी बाब समोर आली.

वाडिभोकर रस्त्यावर ऋषीकेश एन्टरप्राझेस सेल्स अँण्ड सर्व्हिसे नावाचे मयुर निंकुभ यांचे दुकान आहे.यांचे घराजवळच जोशी हे शेजारीच राहतात.मंगळवारी चार ते साडेचार वाजता दुकाना बाजुला कचरा जाळला.या किरकोळ कारणाहुन जोशी यांना राग आला.त्यांनी निकुंभ यांचे दुकानातील मुलाला कचरा बाजुला जाळला ह्या कारणाहुन बेदम मारहाण केली.

नंतर लगेच जोशी यांचे मदतीसाठी आठ,दहा जण सोबत आले त्यांनीहि दुकानात दगडफेक करत दुकानातील साहित्यांची नासधुस केली.
हा सगळा प्रकार दुकाना बाहेर लावेल्या सिसीटिव्ही कँमेऱ्यात कैद झाला आहे.असे त्यांनी सांगितले.दुकानात 50/60 हजाराचे नुकसान झाले आहे.दुकानातील फोडलेल्या काचाचा खच कँबिन मध्ये व रस्त्यावर पडलेला होता.अचानकपणे झालेल्या तोडफोडमुळे परिसरातील नागरीक भयभीत झाले.इतर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने पटापट बंद केली.

या घटनेमुळे वाडिभोकर भागात शुकशुकाट पसरला होता. दुकानात मारहाण,तोडफोड नुकसान केल्या प्रकरणी जोशी व अन्य लोकांन विरुध्द मयुर निकुंभ यांनी पश्चिम देवपुर पोलीस ठाणे गाठत लेखी तक्रार दिली आहे. पोलीसांनी घटनास्थळाची पहाणी केली आहे.राञी उशीरा पर्यत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.

ह्याहि बातम्या वाचा –

धायरीत कुटुंबातील सदस्यांचे हातपाय बांधून दरोडा : लाखोंचा ऐवज लंपास

भांडवलशाही धोक्यात, रघुराम राजन यांचा इशारा

‘काँग्रेसने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची केवळ थट्टा केली आहे’

‘या’ प्रकरणात सापडल्याने पोलीस हवालदाराचे निलंबन

शरद पवारांनी समंजस्य दाखवले असते तर सुजय भाजपात गेले नसते : अशोक चव्हाण