राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्ह्यात बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. शहरात उद्योग सुरु होत नाही.साडेचार वर्षात दोन कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले.व्यापार व्यवसायात मंदिमुळे रोजगार नाही, कर्मचारी संख्या घटविली. याचा फटका रोजगार वाढिला कारणीभूत ठरला. जी एस टी साऱखे जाचक कर लादत उद्योग व्यवसायाला मंदिच्या लाटेत ढकलले. असे आरोप सरकार विरुध्द काढलेल्या मोर्चात घोषणा देत करण्यात आले. बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये प्रचंड असंतोष सरकार विरोधात निर्माण झाला आहे.

धुळे जिल्हात कोणतेही मोठे उद्योग नाही. बेकारी वाढल्याने बेरोेजगार तरुणांची पाऊले गुन्हेगारी कडे,अवैध व्यवसायाकडे पडल्याने शहरात अवैध व्यवसाय, गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बेरोजगारी हटवू असे आश्वासन फक्त सत्तेतील सत्ताधारी देत असुन सरकार तरुणांची चेष्टा करत आहे.

बोरोजगारी हटवायची असेल तर नविन उद्योग शहरात आणून नविन रोजगार तरुणांना मिळवून द्यावे. आश्वासन नको केंद्र सरकार जुमला सरकार आहे. यासाठी राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने जवाब दो मोर्चाचे आयोजन गांधी चौकातून करण्यात आले होते. माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, यांच्या नेतृत्वात काढलेल्या मोर्चात संदिप बेडसे, यश कदबांडे, सत्यजित सिसोदे, किरण शिंदे, किरण पाटील, उमेर अन्सारी, कुणाल पवार, सुनिल वाघ,चंद्रकांत महाजन, रविंद्र रणसिंग, गणेश चौधरी, रणजीत भोसले, सुनिल महाले, ज्योती पावरा, कल्पना महाले, सुवर्णा शिंदे, किरण बागूल, गौरव बोरसे, ललीत वारूडे सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालया जवळ मोर्चा धडकला व शिष्टमंडळाने मागणीसाठी निवेदन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना दिले.

सांगलीतून वंचित विकास आघाडीकडून यांना उमेदवारी