‘त्या’ मुलीच्या सुटकेसाठी मागितली होती ५० लाखांची खंडणी

पिंपरी-चिंचवड : पोलिसनामा ऑनलाईन – नेरे परिसरात घेतलेले घर, दोन महिन्यांपूर्वी जुनी घेतलेली कार आणि इतर उधारी भागवण्यासाठी दोन मित्रांनी अपहरणाचा कट आखला. रस्त्याने जात असताना चिंचवड येथील उच्चभ्रू सोसायटी त्यांच्या नजरेस पडली आणि येथूनच अपहरण करण्याचे ठरवले. त्यानुसार काही दिवस त्या ठिकाणी पाळत ठेवून या दोघांनी १२ वर्षाच्या मुलीचे अपहरण केले. त्यानंतर चार-पाच तासानंतर मुलीच्या पालकांना फोन करून पन्नास लाखांची खंडणी मागून ती ‘डिल’ पंधरा लाखांवर फायनल केली. मात्र मागावर असणाऱ्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अतिशय चलाखीने त्या मुलीची सुखरूप सुटका केली.

खंडणी

 

नितीन सत्यवान गजरमल (२५, देवगाव, ता. परंडा, जी. उसमनाबाद, सध्या रा. नेरे) आणि जितेंद्र पप्पूराम बंजारा (२१, रा. थेरगाव, वाकड) या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास उदयोगनगर, चिंचवड येथिल क्वीन्सटाउन सोसायटी शेजारील एका दुकानासमोरून माही जैन निवासी हिचे अपहरण केले. काळ्या फिल्ममिंग असलेल्या कार मध्ये जबरदस्तीने घालून धूम ठोकली. यावेळी मुलीने आरडा ओरडा केल्याने दुकानदाराने पाठलाग केला होता. मात्र अपहरणकर्ते तिला घेऊन पळून गेले. याची माहिती मिळताच पोलीस खडबडून जागे झाले. स्थानिक पोलीस, वाकड, पिंपरी, निगडी, चिखली, पिंपरी पोलीस ठाण्याची तपास पथके, गुन्हे शाखेची पथके तपासासाठी रवाना झाली. मुंबईला जाणाऱ्या रस्तावरील सर्व टोल नाक्यावर माहिती देऊन अलर्ट करण्यात आले.

पिंपरी चिंचवड : पैश्यासाठी अपहरण केलेल्या मुलीची सुखरूप सुटका

ठीक-ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली, सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले, शहरातील लॉज तपासले गेले. अपहरणकर्त्यांनी मुलीच्या पालकांना साडेआठच्या सुमारास फोनवरून ५० लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. एवढे पैसे शक्य नसल्याने शेवटी ती रक्कम १५ लाख रुपयांवर आली.

दरम्यान, खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अपहरण करून ज्या ठिकाणी मुलीला ठेवले तेथे पोहचले. पोलिसांनी संपूर्ण इमारतीला घेरा घातला. मुलीची सुखरूप सुटका करण्यासाठी अतिशय संयमाने घरी नितीन गजरमलच्या घरी गेले आणि त्या मुलीची सुखरूप सुटका केली. गजरमल हा औंध येथे सिनेमा गृहात काम करतो तर दुसरा जितेंद्र हा डिलिव्हरी बॉयचे काम करतो.

मुलीचे अपहरण झाल्यापासून ते यशस्वी कामगिरी होई प्रयत्न पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, नम्रता पाटील, विनायक ढाकणे, सहायक आयुक्त सतीश पाटील, निरीक्षक सुधीर अस्पत, उत्तम तांगडे, सुधाकर काटे, प्रभाकर शिंदे, विश्वजित खुळे, डॉ. विवेक मुगळीकर, सतीश माने यांच्यासह सहायक निरीक्षक सतीश कांबळे, पाटील, अभिजित जाधव, उपनिरीक्षक विठ्ठल बढे, चाटे, हरिष माने, हर्षल कदम यांच्यासह इतर पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कर्मचारी काम करत होते.