Covid-19 : जगभरात ‘कोरोना’ व्हायरसचा कहर ! अवघ्या 100 तासात 10 लाख लोक ‘संक्रमित’

वाशिंग्टन : जगभरात कोरोना व्हायरसचा कहर मागील 6 महिन्यांपासून सुरू आहे. मागील 100 तासांतच कोरोनाच्या 10 लाख नव्या केसेस समोर आल्या आहेत. शुक्रवारी संपूर्ण जगात कोरोनाने संक्रमित झालेल्या रूग्णांची संख्या 1 कोटी 40 लाखांपर्यंत पोहचली आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार असे प्रथमच झाले आहे की, 100 तासांच्या आत 10 लाख लोक कोविड-19 ग्रस्त झाले आहेत.

कोरोनाचे पहिले प्रकरण चीनमध्ये जानेवारी महिन्यात सापडले होते आणि तेथे तीन महिन्यांच्या आत 10 लाखांपेक्षा जास्त कोरोना संक्रमित झाले. जगात 13 जुलैला कोरोनाच्या रूग्णांची संख्या 1 कोटी 30 लाखांच्या जवळ होती, जी चार दिवसात वाढून 1 कोटी 40 लाखांपर्यंत पोहचली. मागील सात महीन्यात कोरोना व्हायरसने संक्रमित होऊन मरण पावणार्‍यांची संख्या 5,90,000 पर्यंत पोहचली आहे. भारतात कोरोनाने संक्रमित झालेल्यांची संख्या 10 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. येथे मागील आठवडयात दररोज 30 हजारपेक्षा जास्त लोक कोरोना व्हायरसने संक्रमित होत होते.

अमेरिकेत 24 तासात 77 हजार नवी प्रकरणे
तर अमेरिकेत मागील 24 तासादरम्यान कोविड-19 च्या 77 हजार नव्या केस समोर आल्या आहेत. अमेरिकेत कोरोनाच्या संसर्गाचा दररोज नवीन विक्रम होत आहे. कोरानाच्या प्रकरणांच्या बाबतीत ब्राझीलची स्थिती सुद्धा खुप वाईट आहे. स्वीडनमध्ये आतापर्यंत 77,281 कोरोना संसर्गाची प्रकरणे समोर आली आहेत.

ब्राझीलमध्ये 20 लाखांपेक्षा जास्त लोक संक्रमित
दक्षिण अमेरिकेत सर्वात वाईट स्थिती ब्राझीलची आहे. तेथे आतापर्यंत 20 लाखांपेक्षा जास्त कोरोना प्रकरणे समोर आली आहेत. तर या व्हायरसमुळे आतापर्यंत 76,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. येथे मे महिन्यापासून दररोज 1000 पेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. अमेरिकेत मागील 24 तासात 969 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 1,38,000 लोकांचा जीव गेला आहे. तर येथे आतापर्यंत 35 लाखांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत.

कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत स्थिती खुपच वाईट असूनही व्हाईट हाऊस लॉकडाऊन आणि अनेक प्रकारचे प्रतिबंध हटवण्यासाठी लागोपाठ प्रयत्न करत आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्ता कॅली मॅक्नी यांचे म्हणणे आहे की, विज्ञान आमच्या बाजूने आहे. आम्ही स्थानिक प्रशासन आणि राज्य प्रशासनाच्या नियमांचे अनुकरण करण्यासोबत शाळा पुन्हा उघडू शकतो. यामुळे आपल्या मुलांचे जास्त नुकसान होत आहे.