मूकबधिर चिमुकलीवर नातेवाईकाने केला लैगिक अत्याचार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – घरी सहज भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईक मुलाने अल्पवयीन १३ वर्षाच्या मूकबधिर मुलीला घरी नेऊन, तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करत लेंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली.

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर नातेवाईक संजय सत्यवान उत्तेकर  (२७, तळवडे, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी पीडित मुलगी घरी होती. त्यावेळी अटक केलेला नातेवाईक तरुण सहज भेटण्यासाठी घरी आला. पीडित मुलीला त्याच्या घरी घेऊन गेला. तेथे जबरदस्तीने तिच्यावर अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्यावर लेंगिक अत्याचार केले. पोलिसात तक्रार दिल्यास सोडणार नाही अशी धमकीही दिली. याप्रकरणी अधिक तपास चिखली पोलीस करत आहेत.