13 वर्षापुर्वी रस्त्यावरून घेतलेल्या अंगठीमुळं महिला बनली ‘करोडपती’ !

लंडन : वृत्तसंस्था – एखाद्याचे नशीब कधी कसं चमकेल हे कोणीच सांगू शकत नाही. लंडनमधील एका सामान्य महिलेसोबत असंच काही घडलं आहे. ही महिला एका दिवसात करोडपती झाली आहे. लंडनमधील या महिलेने १३ वर्षांपूर्वी रोडवरील गाड्यावरुन फक्त १३ डॉलरमध्ये एक खड्याची अंगठी घेतली होती. ही अंगठी तब्बल ४६ हजार डॉलरची निघाली आहे. त्यामुळे महिलेचं नशीब फळफळ आहे.

या महिलेने १३ वर्षांपूर्वी रोडवरून एक अंगठी खरेदी केली होती. ही अंगठी ही महिला सामान्य अंगठीसमजून हातात घालत होती. या महिलेला कधीही वाटले नसेल की हीच अंगठी तिचे आयुष्य बदलू शकते. या महिलेने खरेदी केलेल्या या अंगठीतील खडा हा तब्बल २६ ते २७ कॅरेटचा हिरा निघाला आहे. या हिऱ्याची खरी किंमत ४६ हजार डॉलर आहे. म्हणजे भारतीय चलनात २९००००० रुपये एवढी झाली आहे. त्यामुळे ही महिला आता लखपती झाली आहे.

अनेक वर्षांपासून सतत हातात घातल्याने अंगठी थोडी खराब झाली होती. त्यामुळे ती ज्वेलर्सकडे नीट करण्यासाठी घेऊन गेली होती. तेव्हा या ज्वेलर्सने या महिलेला सांगितले की अंगठीतील खडा हा १९व्या शतकातील डेड स्टोन आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या हिऱ्याची किंमत लाखोंमध्ये आहे.

आपल्याकडील ह्या खड्याची किंमत लांखोमध्ये असल्याचे समजल्यावर महिला सुखावली. महिलेला पैशांची अधिक गरज होती आणि तेव्हाच ही माहिती समजल्यावर या महिलेने त्वरीत ही अंगठी विकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ही महिला लखपती झाली.

दरम्यान, या घटनेनंतर महिलेने तिची प्रतिक्रिया देत आनंदही व्यक्त केला. हा सुखद धक्काच होता. रोडवरून खरेदी केलेली अंगठी लाखोंची निघाली. त्यामुळे मी आता रोडवरून नेहमीच शॉपिंग करेल. तसंच या अंगठीमुळे माझ्याकडे नवीन घर, गाडी आहे. आता उरेलेल्या पैशांनी कोणतातरी बिझनेस करण्याचा विचार करत असल्याचे तिने सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like