येरवडा परिसरात 30 लाखांचा दरोडा टाकणारे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लघुशंका करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची सॅक जबरदस्तीने हिसकावून नेवून ३० लाख रुपयांची रोकड लांबवणाऱ्या दरोडेखोरांच्या येरवडा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून ११ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा प्रकार १० ऑगस्ट रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास येरवडा येथील मशिदीजवळ घडला होता. याप्रकरणी श्रीनिवासराव करजगीकर यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Yerwada-Police1
येरवडा पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून सुमित बालाजी पाटील (वय-१९ रा. हनुमान नगर, उदगीर) आणि राहुल देवीदास सुर्य़वंशी (रा. २० रा. घणोशी ता. जळकोट, जि. लातुर) यांना संगमवाडी पार्कींग येथून ताब्यात घेण्यात आले. ते लातूरला पळून जाण्याच्या तयारीत असताना येरवडा पोलिसांनी ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांनी संदीप तानाजी बिरादार (वय-२२), मंगेश रमेश बिरादार (वय-२८) यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या गुन्ह्याचा मुख्य सुत्राधार गजानन उर्फ पिंटु पांडुरंग सुवर्णकार (वय-३०) हा असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी सुमित, राहुल, संदीप आणि मंगेश यांना अटक करून सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली गाडी आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गजानन उर्फ पिंटू सुवर्णकार हा फिर्यादी यांच्या मालकाकडे कामाला होता. अपघात झाल्याने त्याने काम सोडले होते. त्याला दुकानातील रोकड कधी आणि कोठे जात असल्याची माहिती माहित असल्याने त्याने पुण्यात राहणाऱ्या मित्रांच्या मदतीने पैसे लुटण्याचा कट रचला. यासाठी पुण्यात राहणारा संदीपची गाडी वापरण्यात आली. घटनेच्या दिवशी संदीप आणि राहुल या दोघांनी बॅग हिसकावून घेऊन जायची आणि इतर दोघांनी झटापट झाल्यास त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करायचा असे ठरले होते. बॅग हिसकावल्यानंतर आरोपींनी पैशांची वाटणी केली होती.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख पोलीस निरीक्षक गुन्हे अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक मंगेश भांगे, सहायक पोलीस फौजदार बाळु बहीरट, पोलीस हवालदार हणमंत जाधव, संदिप मांजुळकर, पंकज मुसळे, अशोक गवळी, मनोज कुदळे, मोहिते, कारखेले, समीर भोरडे, राहुल परदेशी, सकट, सुनिल नागलोत, विष्णु सरोदे, कुंवर, पाडोळे यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –