पुण्यातील भाजपा नेत्याच्या घरावर दरोडा, मारहाणीत आई-वडील गंभीर जखमी

पुणे/शिरुर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील केंदूर येथील भाजपा तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब साकोरे यांच्या घरावर सोमवारी पहाटे तीनच्या समुऱास दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी केलेल्या बेदम मारहाणीत सकोरे यांचे वृद्ध आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

दरोडेखोरांनी केलेल्या माराहणीमध्ये कोंडीबा विठोबा साकोरे आणि लक्ष्मीबाई कोंडीबा साकोरे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरोडेखोरांनी अडीच तोळ्याचे मंगळसुत्र चोरून नेले असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके वेगवेगळ्या दिशेला रवाना केली आहेत.

कपड्याच्या शो-रुमध्ये चोरीचा प्रयत्न –

शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे नव्याने सुरु झालेल्या कपड्याच्या शो-रुममध्ये चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. हा प्रकार सोमवारी पहाटेच्या सुमारास घडला. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केला. पुणे-अहमदनगर महामार्गालगत झालेल्या या घटनेमुळे व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार

बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार

द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे

गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!

गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या

कोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या