सरंक्षण मंत्रालयातही घुसला ‘कोरोना’ अनेक अधिकारी झाले होम क्वारंटाईन

नवी दिल्ली : दिल्लीत कोरोनाचा कहर सुरु असताना आता तो सरंक्षित क्षेत्र म्हणून घोषित असलेल्या परिसरातील नागरिकांमध्ये त्याने शिरकाव केल्याचे आढळून येऊ लागले आहे. नायब राज्यपाल यांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता सरंक्षण मंत्रालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

सरंक्षण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. हा अधिकारी पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात आल्यावर अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांनी आपली कोरोना चाचणी करुन घेतली आहे. तसेच या कोरोना बाधित वरिष्ठ अधिकार्‍यांच्या संपर्कात आलेल्या इतर अधिकार्‍यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन करुन घेतले आहे. त्यामुळे संपूर्ण सरंक्षण मंत्रालयाच्या कार्यालयातील कामकाजावर त्याचा परिणात दिसून येऊ लागला आहे.