थेऊर येथील बायोटेक कंपनीला भीषण आग 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

पुण्यातील थेऊर येथील एका बायोटेक कंपनीला भीषण आग लागली असून ही आग संपूर्ण कंपनी परिसरात पसरली आहे. सकाळी सव्वानऊच्या सुमारास ही घटना घडली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ह्या घटनेमुळे सदर परिसरात घबराट पसरली असून आगीबरोबरच सगळीकडे धुराचे लोट पसरले आहेत. दरम्यान ही आग कशाने लागली हे स्पष्ट झालेलं नाही.

[amazon_link asins=’B07B3NKQRV,B075R5JTZ2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dcc2ce02-b7e8-11e8-a7b7-9bc69540cd0b’]

मिळालेल्या माहितीनुसार, ‘राइस अँड शाइन बायोटेक प्रायवेट लिमिटेड’ नावाच्या कंपनीला आज सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास ही मोठी आग लागली आहे. डी. पी. पाटील ग्रुपमधील ही कंपनी असून त्यात बायोटेक्नॉलॉजी, फ्लोरिकल्चर, फर्टिकल्चर आणि एक्झिक्युट प्लॉट नर्सरी या क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि सेवा दिली जाते. जगभरातील ३० हून अधिक देशात येथील प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेली रोपे निर्यात केली जातात. त्यासाठी येथे सुसज्ज अशी प्रयोगशाळाही उभारण्यात आली आहे.

हडपसर येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे. या आगीत  कोणतीही जीवित हानी झालेली नाही. आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले झालेले नाही. पोलिसांद्वारे नागरिकांना कंपनी परिसरात जाण्यापासून मनाई करण्यात आली आहे. कंपनीतील आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या गाड्याही रवाना झाल्या आहेत .

You might also like