‘भारत बंद’ ! दुकानदार ‘महिलेकडून’ आंदोलकांवर मिरची पावडरची ‘उधळण’

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आज भारत बंदचे विविध ठिकाणी पडसाद उमटले. विविध संघटनांकडून एकत्र येत आज सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात भारत बंदचा इशादा दिला आहे. यावेळी राज्यात अनेक जिल्ह्यात दुकाने बंद ठेवण्यात आली होती परंतु काही ठिकाणी दुकानदारांनी बंद वेळी दुकानं बंद ठेवण्यास विरोध केला. असा प्रकार यवतमाळमध्ये घडला. यावेळी दुकानदाराकडून आंदोलकांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकण्याचा प्रकार घडला.

यवतमाळमध्ये सीएए, एनपीआर आणि एनआरसी विरोधात बंद पुकारण्यात आला आहे यावेळी आंदोलकांकडून दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले परंतु यवतमाळ मधील एका दुकानदारांने आपले दुकान बंद करण्यास विरोध दर्शवला. आंदोलकांने न ऐकल्याने अखेर दुकानदार महिलेने आंदोलकांवर मिरची पावडर फेकली.

दुकान बंद न करण्यासाठी या महिलेने मिरची पावडरच्या पुड्या घेऊन आंदोलकांना आपल्या दुकानापासून दूर जाण्यास प्रवृत्त केले. या महिनेने मिरची पावडरच्या पुड्या घेऊन ती मिरची पावडर आंदोलकांच्या डोळ्यात फेकण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

फेसबुक पेज लाईक करा

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like