एका स्मार्टफोनमुळे पती-पत्नीमध्ये घटस्फोटाची वेळ; कोर्टाने दिला अजब निकाल

भोपाळ:वृत्तसंस्था-  हल्ली प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. सकाळी उठल्या उठल्या आधी आपल्या  मोबाईलमधील व्हॉट्स अप स्टेट्स चेक  करण्यात गुंग असतात. पण या सगळ्यामुळे नात्यांमध्ये कुठेतरी दुरावा निर्मण झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. घरातील माणसांशी सुद्धा प्रत्यक्षात कमी पण टेक्स्ट मेसेज करून बोलणे होते. मित्रांमध्ये, आई-वडील-मुलांमध्ये, पती-पत्नींच्यासंबंधांमध्ये याचा परिणाम पाहायला मिळतो.आता मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.

एका स्मार्टफोनमुळे अली पती-पत्नीमध्ये घटस्फोटाची वेळ 

भोपाळमधील कौटुंबिक न्यायालयात असेच एक प्रकरण पाहायला मिळाले. या प्रकरणात एका स्मार्टफोनमुळेच पती-पत्नीमध्ये घटस्फोटाची वेळ आली. याप्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने प्रथम त्यांना समुपदेशानाचा सल्ला दिला. नंतर त्यांनी आपला रोचक निर्णय दिला. जेव्हा घटस्फोटाबाबत न्यायालयात युक्तीवाद सुरू झाला. तेव्हा यांच्या भांडणाचे मुळ हे मोबाइल फोन असल्याचे समोर आले.

समुपदेशनादरम्यान पत्नी संगीताने म्हटले की, पती स्मार्टफोन वापरतो आणि आपल्याला त्याने एक साधा फोन दिला आहे. तो माहेरी फोनही करू देत नसल्याचे म्हटले. यावर पतीने न्यायालयाला सांगितले की, पत्नीने सासरी येताना स्मार्टफोन आणला होता. पण ती दिवसभर मोबाइलवर मेसेज करणे आणि सेल्फी घेण्यातच मग्न असायची. या स्मार्टफोनमुळे तिचे घरात लक्ष कमी झाले होते. अनेकवेळा ती स्वयंपाकही बनवत नव्हती. त्यामुळे तिच्याकडून स्मार्टफोन घेऊन तिला साधा फोन दिल्याचे त्याने सांगितले.

कोर्टाचा अजब निकाल

दोघांचेही म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश आश्चर्यचकित झाले. त्यावेळी निकाल देताना न्यायाधीशांनी म्हटले की, पत्नी जेव्हा घरातील सर्व काम संपवेल. तेव्हाच तिने मोबाइलला हात लावावा. त्याचबरोबर लग्नाच्या वाढदिवशी पतीने तिला स्मार्टफोन घेऊन द्यावा.

पत्नीने पतीसमोर ठेवलेल्या या ७ अटी पाहा

१. वर्षातून एकदा पत्नीला शहराबाहेर फिरायला घेऊन जावे लागेल.

२. महिन्यातून एकदा रेस्तराँमध्ये पत्नीला जेवायला घेऊन जावे लागेल.
३. पंधरा दिवसाआड एक चित्रपट दाखवावा लागेल.
४. प्रत्येक महिन्याला पतीने पत्नीला खर्चासाठी २ हजार रूपये द्यावे लागतील. त्याचा हिशोबही विचारायचा नाही.
५. पत्नीच्या माहेरी होणाऱ्या कार्यक्रमांवर कोणतीही टिप्पणी करायची नाही.
६. पती कधीही पत्नीला माहेरी फोन करण्यापासून रोखू शकत नाही.
७. माहेरच्या लोकांविषयी पतीने कधीच अपशब्द वापरू नयेत.