#Video : ATM मधून काढायला गेला पैसे निघाला साप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – साप असे नुसते नवा जरी काढले तरी अनेकांची भंबेरी उडते. पण तमिळनाडू मधील एका एटीएम मधून पैसे नाही तर चक्क सापच बाहेर काढण्यात आला. कोईमतूर येथील ठाणेरपंडल रोड परिसरात असणाऱ्या एटीम सेंटर मधील मशिनमध्ये चक्क साप असल्याचे समजले. याठिकाणी २ ATM मशिन्स होते त्यापैकी एका मशीनमध्ये साप गेला होता. पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना ही बाब लक्षात आल्यानंतर एका सर्पमित्राला याठिकाणी बोलावण्यात आले. मोठ्या शिताफीने या सर्पमित्राने हा साप बाहेर काढला. आणि सर्वानीच सुटकेचा निश्वास टाकला. याबाबतचा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने दिला आहे.

मतदान यंत्रात आढळला साप
दरम्यान, मंगळवारी लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. यावेळी केरळच्या कन्नूर लोकसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर एका व्हीव्हीपॅट मशीनच्या आतमध्ये छोटा साप आढळला होता. मतदान यंत्रात साप दिसताच मतदान केंद्रावर एकच गोंधळ निर्माण झाला. निवडणूक अधिकारी मतदारांमध्ये भिती पसरली. थोड्या वेळाने या सापाला बाहेर काढण्यात आले व मतदान सुरु झाले.

थिरुअनंतपुरमपासून ५२० किमी अंतरावर असलेला कन्नूर भाग निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर जंगल परिसर असल्यानेच इथल्या कंडकई मतदान केंद्रावर साप निघाला असावा, असे सुत्रांकडून कळते. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असले तरी मतदानावर त्याचा कुठलाही परिणाम झालेला नाही.

You might also like